GK : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर क्रॉस चिन्ह का असतं ? 99 % लोकांना माहीतच नसेल कारण
रेल्वेच्या शेवटच्या डब्यावरील 'X' चिन्ह केवळ डिझाइन नसून एक महत्त्वाचा सुरक्षा नियम आहे. रेल्वेमार्गांवरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या जीवनाशी हाँ निगडित आहे. चला, सोप्या भाषेत या 'X' चा खरा अर्थ समजून घेऊया.

आपल्यापैकी बहुतांश लोकांनी कधी ना कधी भारतीय रेल्वेने प्रवास केला असेल. पण प्रत्येक ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर एक मोठे 'X' चिन्ह का असतं, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अगदी रोज लोकल किंवा एक्सप्रेस ट्रेनमध्ये जागेसाठी धक्काबुक्की करणाऱ्या प्रवाशांनाही यामागील खरे कारण माहीत नसते. हे केवळ एक डिझाइन आहे असं समजून बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात.

पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, ट्रेनच्या डब्यामागे असलेलं हे केवळ एक डिझाइन नसून, भारतीय रेल्वेचा एक महत्त्वाचा सुरक्षा नियम आहे. रेल्वेमार्गांवरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या जीवनाशी तो संबंधित आहे. या 'X' चा खरा अर्थ सोप्या शब्दांत समजून घेऊया.

या चिन्हाचं मुख्य कार्य म्हणजे, स्टेशन मास्तर आणि ट्रॅकमन यांसारख्या रेल्वे कर्मचाऱ्यांना, संपूर्ण ट्रेन स्टेशन किंवा ट्रॅक सुरक्षितपणे पुढे गेली आहे, हे कळवणे हे असतं. जर शेवटच्या डब्यावर 'X' चिन्ह दिसत असेल, तर याचा अर्थ असा होतो की कोणताही डबा मागे राहिलेला नाही.

आपत्कालीन किंवा अपघात सूचना : लक्षात ठेवा की, जर एखादी ट्रेन स्टेशनवरून निघत असेल किंवा स्टेशनवरून जात असेल आणि तिच्या शेवटच्या डब्यावर 'X' चिन्ह नसेल, तर याचा स्पष्ट अर्थ असा होतो की काहीतरी गडबड आहे. म्हणजेच, वाटेत काही डबे मागे राहिलेले आहेत. हे पाहून, रेल्वे कर्मचारी तात्काळ आपत्कालीन सूचना जारी करतात आणि त्याच मार्गावरील इतर गाड्यांना त्वरित थांबवले जातं, जेणेकरून कोणताही मोठा अपघात होऊ नये.

धुकं आणि अंधाऱ्या रात्री ठरतं उपयुक्त: हे 'X' चिन्ह अनेकदा चमकदार पिवळ्या किंवा पांढऱ्या रेडियम रंगाने रंगवलेलं असतं. म्हणजे अगदी मिट्ट काळोखात, अंधारात, किंवा मुसळधार पावसात अथवा धुक्यातही ते चिन्ह दुरूनही स्पष्टपणे दिसू शकतं. रात्रीच्या वेळी, या चिन्हाच्या खाली एक लाल दिवा चमकतो. हा दिवा मागून येणाऱ्या इतर गाड्यांबद्दल चालकांना सावध करतो.

त्याच्या शेजारी आणखी काय लिहिलेलं असतं : तुम्ही नीट लक्ष दिलं तर दिसेल की, या पाटीवर मोठ्या अक्षरात 'LV' असे लिहिलेले आहे, ज्याचा अर्थ 'शेवटचे वाहन' (Last Vehicle) असा होतो. यामुळे हा गाडीचा शेवटचा भाग आहे, याची कर्मचाऱ्यांना खात्री पटते.