
भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर आणि महेंद्र सिंह यांच्यात काही अलबेल नसल्याच्या चर्चा अनेकवेळा दबक्या आवाजात ऐकल्या असतील. गंभीर अनेकवेळा आपल्या मुलाखतीमध्ये तो नाव न घेता धोनीला टार्गेट करत होता. मात्र आता गेल्या काही दिवसांपून तो धोनीचं कौतुक करताना दिसत आहे. अशातच धोनीबाबत आणखीन एक वक्तव्य गंभीरने केलं आहे.

महेंद्र सिहं धोनी याची बरोबरी कोणी करू शकत नाही. अनेक कॅप्टन आले आणि भविष्यातही येऊन जातील पण धोनीसोबत त्याची बरोबरी कोणीच करू शकणार नाही, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.

जर धोनीने तिसऱ्या क्रमांकावर बॅटींग केली असतील तर त्यान वनडे क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड मोडले असते. कर्णधारपदामुळे धोनीने बॅटींगचा त्याग केला. कारण संघाला पुढे नेण्यासाठी तो स्वत: ला विसरल्याचं गंभीर म्हणाला.

महेंद्र सिंह धोनीने जिंकलेल्या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये गौतम गंभीर याने मॅचविनर खेळी केल्या आहेत. टी-20 वर्ल्ड कप फायनल 2007 मध्ये 75 धावा तर वन डे वर्ल्ड कप फायनलमध्ये 97 धावांची संघासाठी महत्त्वाची खेळी केली होती.

दरम्यान, अनेकवेळा गंभीरच्या वक्तव्यांवरून तो धोनीला उद्देशून बोलत आहे असं वाटत होतं, मात्र आता गंभीर जाहीरपणे धोनीचं कौतुक करत असल्याने क्रिकेट वर्तुळात याची चर्चा आहे