World Lion Day: सिंहाची जंगलाचा राजा म्हणून ओळख, सिंहाचा अधिवास नेमका कुठं?

| Updated on: Aug 10, 2021 | 11:59 AM

भारतात आशियाई म्हणजेच एशियाटिक सिंह गुजरात मधील सासण-गीर नॅशनल पार्कमध्ये आढळतात. डब्ल्यू डब्ल्यू एफच्या मतानुसार आफ्रिका, आशिया आणि यूरोपमध्ये सिंह मोठ्या प्रमाणात आढळत होते. मात्र, नंतर त्यांची संख्या कमी होत गेली.

1 / 6
जागतिक सिंह दिवस दरवर्षी 10 ऑगस्टला साजरा केला जातो. सिंहाचं संरक्षण आणि संवर्धन या संदर्भात जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. वर्ल्ड वाईड फंड फॉर अॅनिमल या संस्थेच्या मतानुसार सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं, मात्र, सिंह हा गवताळ प्रदेश आणि सपाट भागात  वास्तव्य करतो, असं म्हटलं आहे.

2 / 6
भारतात आशियाई म्हणजेच एशियाटिक सिंह गुजरात मधील सासण-गीर नॅशनल पार्कमध्ये आढळतात. डब्ल्यू डब्ल्यू एफच्या मतानुसार आफ्रिका, आशिया आणि यूरोपमध्ये सिंह मोठ्या प्रमाणात आढळत होते. मात्र, नंतर त्यांची संख्या कमी होत गेली.

भारतात आशियाई म्हणजेच एशियाटिक सिंह गुजरात मधील सासण-गीर नॅशनल पार्कमध्ये आढळतात. डब्ल्यू डब्ल्यू एफच्या मतानुसार आफ्रिका, आशिया आणि यूरोपमध्ये सिंह मोठ्या प्रमाणात आढळत होते. मात्र, नंतर त्यांची संख्या कमी होत गेली.

3 / 6
सिंह हा भव्य आणि धैर्यवान प्राणी आहे. भारत एशियाटिक सिंहाचे माहेरघर असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक सिंह दिना निमित्त केलं आहे.

4 / 6
जागतिक सिंह दिनानिमित्त, सिंह संवर्धनाची आवड असलेल्या सर्वांना मी माझ्या शुभेच्छा देतो.  गेल्या काही वर्षांमध्ये भारताच्या सिंहाची संख्या  सातत्याने वाढतेय, ही निश्चितच आनंदित करणारी बाब असल्याचं  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटम मध्ये म्हटलं आहे.

5 / 6
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील ट्विट केलं आहे. जागतिक सिंह दिनानिमित्त, आपण या भव्य प्राण्याच्या संवर्धन करण्यासाठी जनजागृती करूया. सिंहासाठी सुरक्षित अधिवास निर्माण करण्यासाठी आपण स्वतःला पुन्हा समर्पित करू जेणेकरून सिंहांची भारतातील संख्या आणखी वाढेल, असंही उपराष्ट्रपती म्हणाले.

6 / 6
केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी देखील ट्विट करुन सिंहांच्या सवर्धनासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांबद्दल सांगितलं आहे. जागतिक सिंह दिनानिमित्त   यशोगाथा जी #WorldLionDay वर सांगितली पाहिजे, असं म्हटलंय. गुजरातमध्ये 30,000 चौरस किलोमीटरमध्ये  674 एशियाटिक सिंह असून त्यांची संख्या वाढत असल्याचं त्यांनी सांगितलंय.