Yami Gautam : टीव्ही ते सिनेमा.. लेडी सुपरस्टार यामी गौतमला सहज नाही मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; असा आहे थक्क करणारा प्रवास

टीव्ही जाहिराती आणि छोट्या पडद्यापासून अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या यामी गौतमने १८ वर्षांच्या प्रवासात हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘विकी डोनर’पासून ‘उरी’, ‘बाला’, ‘ए थर्सडे’ आणि ‘आर्टिकल ३७०’पर्यंत विविध आव्हानात्मक भूमिका साकारल्यानंतर यामीने ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळवला. जाणून घ्या हिमाचलच्या बिलासपूरपासून राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोहोचलेल्या यामी गौतमच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी.

| Updated on: Oct 01, 2026 | 3:00 PM
1 / 6
अभिनेत्री यामी गौतमने ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळवत आपल्या अभिनय कारकिर्दीत मोठा टप्पा गाठला आहे. तब्बल १८ वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या यामीने आज हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. २८ नोव्हेंबर १९८८ रोजी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे यामी गौतमचा जन्म झाला.

अभिनेत्री यामी गौतमने ७२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळवत आपल्या अभिनय कारकिर्दीत मोठा टप्पा गाठला आहे. तब्बल १८ वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावरून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या यामीने आज हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. २८ नोव्हेंबर १९८८ रोजी हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथे यामी गौतमचा जन्म झाला.

2 / 6

शिक्षण घेत असताना अभिनयाची आवड अधिक प्रबळ झाल्याने तिने शिक्षण अर्धवट सोडून मुंबईची वाट धरली. मुंबईत आल्यानंतर यामीने टीव्ही जाहिराती आणि मॉडेलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात केली. एका प्रसिद्ध फेस क्रीमच्या जाहिरातीमुळे यामीला मोठी लोकप्रियता मिळाली आणि ती घराघरात पोहोचली.

3 / 6

२००८ मध्ये ‘चांद के पार चलो’ या मालिकेतून यामीने छोट्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून पदार्पण केले. ‘ये प्यार ना होगा कम’ या मालिकेमुळे यामीला टेलिव्हिजन विश्वात विशेष ओळख मिळाली. त्यानंतर २०१२ मध्ये आयुष्मान खुरानासोबत ‘विकी डोनर’ या चित्रपटातून यामीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

4 / 6

विकी डोनर’नंतर यामीने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका स्वीकारत आपल्या अभिनयाची क्षमता सिद्ध केली. ग्लॅमरस भूमिकांपेक्षा आव्हानात्मक आणि आशयपूर्ण व्यक्तिरेखांना प्राधान्य देणे ही यामीच्या कारकिर्दीची खासियत ठरली. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘काबिल’, ‘बाला’ आणि ‘ओह माय गॉड २’ यांसारख्या चित्रपटांमधून तिने दमदार अभिनय केला.

5 / 6

‘ए थर्सडे’, ‘आर्टिकल ३७०’ आणि ‘हक’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांनीही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. विविध प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारत यामीने स्वतःला एका चौकटीत न अडकवता अष्टपैलू अभिनेत्री म्हणून सिद्ध केले. ७२वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्यानंतर यामीने हा सन्मान आपल्यासाठी मोठी जबाबदारी वाढवणारा असल्याचे म्हटले आहे.

6 / 6

‘माझे पाय जमिनीवरच आहेत आणि ते जमिनीवरच राहतील, तितके चांगले’, अशी भावना यामीने व्यक्त केली. छोट्या शहरातून येऊन इथपर्यंत पोहोचणे ही मोठी गोष्ट असल्याचे सांगत, अजून बराच मोठा प्रवास बाकी असल्याचेही तिने नमूद केले. पुढेही स्वतःला कलाकार म्हणून आव्हान देणाऱ्या आणि प्रेक्षकांनाही आवडतील अशा ओरिजिनल कथा व भूमिका करण्याची इच्छा यामीने व्यक्त केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us