
बिग बॉसच्या घरातील मास्टरमाइंड विकास गुप्ताचे अनेक चाहते आहेत. याच विकास गुप्तानं आता स्वत:बाबत मोठा खुलासा केला आहे. (Big revelation of actor Vikas Gupta)

आपण बायसेक्शुअल असल्याचं त्यानं चाहत्यांना सांगितलं आहे.

एवढंच नाही तर त्यानं एक खंत सुद्धा व्यक्त केली आहे. बायसेक्शुअल असल्याची आपल्या आई आणि भावाला लाज वाटते, असं त्यानं सांगितलं आहे.

काही दिवसांपूर्वी विकासचा भाऊ सिद्धार्थचा वाढदिवस पार पडला. मात्र या पार्टीला विकासला आमंत्रित करण्यात आलं नव्हतं.

जेव्हा पहिल्यांदा कुटुंबियांना आपण बायसेक्शुअल असल्याचं सांगितलं. त्यावेळीच कुटुंबियांनी आपल्याशी नातं तोडलं असल्याचंही विकासनं एका मुलाखती दरम्यान सांगितलं.(Big revelation of actor Vikas Gupta)