
दिवाळीत सगळीकडे नुसता उत्साह असतो. दिवाळी पार्टी, दिवाळी फराळ, मित्र मैत्रिणी, घरी पूजा. या सगळ्यात स्टायलिश कपडे आणि फॅशनेबल कपडे तर लागणारच ना? त्याहीपेक्षा या दिवाळी सारख्या सणाला एक ड्रेस ने कुठे काय होत असतं? आपल्याला तर खूप कपडे लागणार! गोंधळून जाऊ नका...आमच्याकडे काही ऑप्शन्स आहेत.

लाइम ग्रीन कलर हा फार अंडर रेटेड कलर आहे. काजोलने ही नेसलेली साडी बघा. दिवाळीसाठी हा लूक एकदम परफेक्ट आहे. या साडीला फ्लोरल डिझाइन आहे. काठ सोनेरी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काजोलने यावर स्लीव्हलेस ब्लाऊज घातलेला आहे.

फातिमा सना शेख नेहमीच तिच्या हटके फॅशन साठी ओळखली जाते. दिवाळीसाठी व्हाईट लूक परफेक्ट आहे. मोत्यांचे दागिने, पांढरी साडी आणि त्या मोत्यांच्या नेकलेसवर मध्ये हिरव्या रंगाचा डायमंड! हा लूक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.

आलिया भट दिसायला सुंदर आणि तिचे अनेक चाहते आहे. ती नेहमीच वेगवेगळ्या लुक्स मध्ये दिसते. हा तिचा लूक सुद्धा तुम्ही दिवाळीसाठी ट्राय करू शकता. प्रिंटेड स्लीव्हलेस ब्लाऊज आणि पिंक कलरची साडी. तिच्या लूकने चाहते घायाळ होऊ शकतात तर तुम्हीही करूनच बघा हा प्रयोग.

फक्त साडीच कशाला? आजकाल हवे तसे स्टायलिश सूट सुद्धा उपलब्ध आहेत. तारा सुतारियाचा हा सूट बघा, इतका सुंदर सूट तुम्ही सुद्धा घालू शकता. नेव्ही ब्लू कलरच्या या सूटसोबत बिंदी आणि लाईट मेकअप मध्ये तारा अतिशय सुंदर दिसतेय.