
बिग बॉस OTT 3 फेम अभिनेता आणि युट्यूबर अदनान शेख आपल्या विवाहामुळे चर्चेत होता. बहिण इफतने अदनानवर गंभीर आरोप केले होते. अदनानची बायको हिंदू आहे. तिने लग्नासाठी धर्म बदललाय. तिचं खरं नाव आएशा नाही, रिद्धि आहे, असा दावा इफतने केला होता.

आता अदनानने इन्स्टावर Q&N सेशनमध्ये फॅन्सला सांगितलं की, त्याची बायको आएशना हिंदू नाही, मुस्लिमच आहे. इस्लाममध्ये इंटर-कास्ट लग्न होत नाही. जे लोक असं लग्न करतात. त्यांचे संबंध आणि त्यातून जन्माला येणारी मुलं वैध मानली जात नाहीत.

अदनानने याचवर्षी 25 सप्टेंबरला आएशासोबत धुम धडाक्यात लग्न केलं होतं. निकाहनंतर कपल लगेच उमराहसाठी मदीनाला गेलं. अदनानच्या पत्नीने संपूर्ण लग्नात आपला चेहरा मास्कने कवर केलेला. आएशाचा चेहरा अजून दाखवलेला नाही.

अदनानची बहिण इफतने सांगितलं की, मी आएशाला आधीपासून ओळखते. भाऊ आणि वहिनीच्या लव्ह स्टोरीची कल्पना आहे. इफतनेच आएशाच्या धर्म परिवर्तनाचा खुलासा केला. बऱ्याच काळापासून तिचा इस्लाम धर्माकडे कल होता. तिने तिच्या इच्छेने धर्म बदललाय.

इफतचे आता तिच्या भावासोबत म्हणजे अदनानसोबत चांगले संबंध नाहीयत. तिने आपल्या भावावर मारहाणीचा आरोप केलेला. दोघांमध्ये कायदेशीर खटला सुरु आहे.