पुणे लोकसभेसाठी ‘आप’ची तयारी, असिम सरोदेंचं नाव चर्चेत

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

पुणे: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. दिल्लीतील चार वर्षांच्या कामाच्या जोरावर आप निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी प्रामुख्याने शहरी भागावर लक्ष केंद्रित करण्याचा ‘आप’चा इरादा आहे. लवकरच उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या आपकडून पुण्याच्या जागेसाठी प्रसिद्ध वकील असिम सरोदे, मुकुंद किर्दत, लेफ्टनंट कर्नल सुरेश […]

पुणे लोकसभेसाठी आपची तयारी, असिम सरोदेंचं नाव चर्चेत
Follow us on

पुणे: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहे. दिल्लीतील चार वर्षांच्या कामाच्या जोरावर आप निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रामुख्याने शहरी भागावर लक्ष केंद्रित करण्याचा ‘आप’चा इरादा आहे. लवकरच उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. सध्या आपकडून पुण्याच्या जागेसाठी प्रसिद्ध वकील असिम सरोदे, मुकुंद किर्दत, लेफ्टनंट कर्नल सुरेश पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आणि श्रीकांत आचार्य यांची नावे चर्चेत आहेत.

त्यामुळे आपकडून कोणाला उमेदवारी मिळते आणि कोण प्रत्यक्ष निवडणूक लढण्यासाठी तयार होतं हे येत्या काळात स्पष्ट होईल.

गेल्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही आपने महाराष्ट्रात उमेदवार उभे केले होते. अहमदनगर जिल्ह्यातून अभिनेत्री दीपाली सय्यद, जळगावमधून डॉ. संग्राम पाटील, रावेरमधून  प्रतिभा शिंदे, पालघरमधून पांडुरंग पारधी, अकोल्यातून अजय हिंगलेकर, तर वर्धा मतदारसंघातून मोहम्मद अलीम पटेल यांना आपने मागील निवडणुकीत उमेदवारी दिली होती. याशिवाय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनाही आपने मुंबईत भाजपच्या किरीट सोमय्यांविरोधात उमेदवारी दिली होती.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील  48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.