आदित्य ठाकरे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पुन्हा ‘ती’ आठवण करुन दिली

| Updated on: Sep 07, 2022 | 8:02 PM

आरोग्यमंत्री हाफकिन संस्थेचा उल्लेख हाफकिन नावाचा माणूस असं करतात. त्यांना हाफकिन पण दलाल वाटला का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. हाफकिन संस्था शासनाची संस्था आहे हे देखील त्यांना माहिती नव्हतं. ती खूप मोठी संस्था आहे हे त्यांना माहिती नाही का? असं म्हणत टीकेची झोड उठवली आहे.

आदित्य ठाकरे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना पुन्हा ती आठवण करुन दिली
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत(Health Minister Tanaji Sawant ) यांचा ससून रुग्णालयातील दौरा चांगलाच व्हायरल झाला. हाफकिन(haffkine) नावाच्या माणसाकडून औषधं घेणं बंद करा असा आरोग्यमंत्र्यांनी दिलेला आदेश थेट पेपरात छापून आला आणि त्यांचे अज्ञान उघड झाले. त्यांच्यावर चांगलीच टीका झाली. युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देखील आरोग्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. नशीब ह्यापकिंग यांना खेकडा वाटलं नाही असं म्हणत आदित्य ठाकरेंनी(Aditya Thackeray ) त्यांची खिल्ली उडवली आहे.

हाफकिन पण दलाल वाटला का?

आरोग्यमंत्री हाफकिन संस्थेचा उल्लेख हाफकिन नावाचा माणूस असं करतात. त्यांना हाफकिन पण दलाल वाटला का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. हाफकिन संस्था शासनाची संस्था आहे हे देखील त्यांना माहिती नव्हतं. ती खूप मोठी संस्था आहे हे त्यांना माहिती नाही का? असं म्हणत टीकेची झोड उठवली आहे.

मी स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे मला हाफकीन बद्दल कसं माहिती नसेल, असा प्रश्न करत सोशल मीडियात फिरणारी बातमी पूर्णपणे चुकीचं असल्याचा दावा करत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी खुलासा केला.

धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर आदित्य ठाकरेंची टीका

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हं गोठवण्यात यावे अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याच्या मागणीवर आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे. शिंदे गटाकडून घाणेरडं राजकारण सुरु असल्याचं आदित्य ठाकरे म्हणालेत.

शिवसैनिक हाच आमचा वारसा

शिवसेना फोडण्याची अशी हिंमत वृत्ती कधी कोणी केली दाखवली नव्हती ही वृत्ती आता लोकांसमोर येत आहे. आमच्या सोबत उभे राहिलेले शिवसैनिक हेच आमचा सगळ्यात मोठा वारसा आहे.

लोकांना ही गद्दारी पटलेली नाही. यामुळे ज्यांना तिकडे जायचं असेल स्वतःचं राजकीय कॅरियर डुबवायचं असेल मी आता त्यांना काही सांगू शकत नाही असे आदित्य म्हणाले.