अजित पवारांचा नौटंकी करुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न : संजय काकडे

काल भांडायचं आणि आज राजीनामा द्यायचा, पुन्हा शरद पवार म्हणतील ते करायचं, नौटंकी करून सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न आहे, असंही संजय काकडे (Ajit Pawar Sanjay Kakade) म्हणाले.

अजित पवारांचा नौटंकी करुन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न : संजय काकडे
| Edited By: | Updated on: Sep 28, 2019 | 7:51 PM

पुणे : राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं. पण अजित पवारांची पत्रकार परिषद ही निव्वळ नौटंकी होती, असा घणाघात भाजपचे खासदार संजय काकडे (Ajit Pawar Sanjay Kakade) यांनी केलाय. काल भांडायचं आणि आज राजीनामा द्यायचा, पुन्हा शरद पवार म्हणतील ते करायचं, नौटंकी करून सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न आहे, असंही संजय काकडे (Ajit Pawar Sanjay Kakade) म्हणाले.

अजित पवारांना राजीनामा द्यायची खरंच गरज नव्हती. पत्रकार परिषदेत हे सांगतात ते खोटं आहे, असंही संजय काकडे म्हणाले. शिखर बँक प्रकरणी अजित पवारांनी स्वतःवरील आरोप फेटाळले आणि यात माझं नाव नसतं तर केसही झाली नसती, असं अजित पवार म्हणाले होते.

वाचा – अजित पवारांकडून सत्तेचा गैरवापर, गोपीनाथ मुंडेंवरही लाठी हल्ला : संजय काकडे

शालिनीताई पाटील यांचे तीन कारखाने कचरा भावाने विकले. त्यावेळी 350 कोटींचा कारखाना कवडीमोल भावाने 35-40 कोटींना विकला. जयंत पाटलांनी औरंगाबादचा कारखान्यात कमी किमतीत घेतला, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखाने यांच्याच (राष्ट्रवादी) नेत्यांनी विकत घेतले, असा आरोपही संजय काकडे यांनी केला.

वाचा – काँग्रेसमुक्त महाराष्ट्र झाला, राष्ट्रवादीनेही बारामतीच्या बाहेर लढू नये : संजय काकडे

अजित पवारांचं तांडव करून पक्षातील नेतृत्वाचं भांडण आहे. शरद पवारांनंतर कोणाचं नेतृत्व यावरून हा वाद चाललाय. शरद पवारांनी कुठे तरी हा कारखाना या माणसाला विका, किंवा मालमत्ता किंमत कमी करा, असं काहीतरी आढळून आलं असेल, त्यामुळे गुन्हा दाखल असेल. त्यामुळे अस्थिर होण्याची गरज नाही, असंही संजय काकडे म्हणाले.

वाचा – उदयनराजेंचा पराभव निश्चित, सुप्रिया सुळे लाखाने हरतील : संजय काकडे

अजित पवारांची पत्रकार परिषद

अजित पवार आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिला आणि ते गायब झाले. नाट्यमय घडामोडींनंतर शरद पवारांच्या घरी पवार कुटुंबीयांची बैठक झाली. त्यानंतर अजित पवारांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली.

वाचा – अजित पवार आणि संजय काकडेंच्या बैठकीत नेमकं काय ठरलं?

माझ्या सदसदविवेकाला जागून राजीनामा दिला. या निर्णयाने पक्षातील अनेकांना दुःख झालं. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा झाला तेव्हाही असंच झालं होतं. मी जर कुणालाही सांगितलं असतं तर त्यांनी मला निर्णय घेऊ दिला नसतो. त्यांना दुखावलं म्हणून मी त्यांची माफी मागतो,  अजित पवार म्हणाले.