काँग्रेसमुक्त महाराष्ट्र झाला, राष्ट्रवादीनेही बारामतीच्या बाहेर लढू नये : संजय काकडे

पुणे : लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडलाय. कारण, काँग्रेस फक्त एका जागेवर उरल्याचं दिसत आहे. अत्यंत कमी फरकाने काँग्रेसचे चंद्रपूरचे उमेदवार बाळू धानोरकर आघाडीवर आहेत. काँग्रेस मुक्त महाराष्ट्र झाल्याची प्रतिक्रिया भाजप खासदार संजय काकडे यांनी दिली आहे. शिवाय राष्ट्रवादीनेही आता आत्मपरीक्षण करावं, बारामती सोडून त्यांनी कुठंच उभा राहू नये, असा सल्लाही त्यांनी पवार कुटुंबाला …

sanjay kakade baramati, काँग्रेसमुक्त महाराष्ट्र झाला, राष्ट्रवादीनेही बारामतीच्या बाहेर लढू नये : संजय काकडे

पुणे : लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडलाय. कारण, काँग्रेस फक्त एका जागेवर उरल्याचं दिसत आहे. अत्यंत कमी फरकाने काँग्रेसचे चंद्रपूरचे उमेदवार बाळू धानोरकर आघाडीवर आहेत. काँग्रेस मुक्त महाराष्ट्र झाल्याची प्रतिक्रिया भाजप खासदार संजय काकडे यांनी दिली आहे. शिवाय राष्ट्रवादीनेही आता आत्मपरीक्षण करावं, बारामती सोडून त्यांनी कुठंच उभा राहू नये, असा सल्लाही त्यांनी पवार कुटुंबाला दिलाय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरही संजय काकडेंनी निशाणा साधलाय. लाव रे व्हिडिओ म्हणणाऱ्यांनी आता व्हिडिओ एकट्याने पाहत बसावं, असं ते म्हणाले. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुकही काकडेंनी केलं. महाराष्ट्रात काँग्रेस एक आणि राष्ट्रवादीचा चार ठिकाणी विजय होताना दिसतोय. काँग्रेसचा महाराष्ट्रासह देशात दारुण पराभव झालाय.

राष्ट्रवादीच्या बारामतीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी भाजप उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केला. तर रायगडमधून सुनील तटकरेंनी शिवसेनेच्या अनंत गीतेंवर 21 हजार मतांनी मात केली. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांच्या विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे. तर शिरुरमधून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.

एनडीएने देशभरात 347 जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. तर यूपीएला 88 जागा मिळत असल्याचं चित्र आहे. विविध पक्षांनी मिळून 107 जागांवर आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत महायुतीने 42 जागा जिंकल्या होत्या. यावेळीही तेवढ्याच जागा राखल्या आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *