युती झाली तर मित्रपक्षाला जिंकवू, अन्यथा आसमान दाखवू : अमित शाह

| Updated on: Jul 05, 2019 | 4:43 PM

लातूर : युतीवर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच थेट जाहीर भाष्य केलंय. युती झाली तर ठिक, अन्यथा विरोधकांसारखं मित्रपक्षाला (शिवसेना) आसमान दाखवू, असं अमित शाह म्हणालेत. मराठवाड्यातील बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अमित शाहांनी युतीच्या संभ्रमात राहू नका, असं स्पष्ट केलं आहे. लातूरमध्ये मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बूथ कार्यकर्त्यांशी आणि बूथ प्रमुखांशी अमित […]

युती झाली तर मित्रपक्षाला जिंकवू, अन्यथा आसमान दाखवू : अमित शाह
Follow us on

लातूर : युतीवर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदाच थेट जाहीर भाष्य केलंय. युती झाली तर ठिक, अन्यथा विरोधकांसारखं मित्रपक्षाला (शिवसेना) आसमान दाखवू, असं अमित शाह म्हणालेत. मराठवाड्यातील बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अमित शाहांनी युतीच्या संभ्रमात राहू नका, असं स्पष्ट केलं आहे.

लातूरमध्ये मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील बूथ कार्यकर्त्यांशी आणि बूथ प्रमुखांशी अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधलाय. पूर्ण ताकदीने तयारीला लागण्याच्या सूचना अमित शाहांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

संघटन हीच भाजपची ताकद आहे. मोदी सरकारच्या आणि फडणवीसांच्या काळात एक पैशाचा घोळ नाही. काँग्रेसच्या काळात घोटाळे झाले याचे आरोप आम्ही नाही केले, सीबीआय सारख्या संस्थांनी ते बाहेर आणले, असं म्हणत अमित शाहांनी राफेल घोटाळ्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचाही समाचार घेतला.

भाजपची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवा. प्रत्येक घरात भाजप ही संकल्पना राबवा आणि जनसंपर्क मजबूत करा. ही निवडणूक पानिपतचं युद्ध आहे. सर्वात यशस्वी नेता आपलं नेतृत्त्व करतोय, असं म्हणत अमित शाहांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्रही दिला.

अमित शाहांच्या भाषणानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला. प्रत्येक जिल्ह्यातील बूथ कार्यकर्ता पूर्ण शक्तीने तयारीला लागला आहे. त्यामुळे भाजपचा हा आत्मविश्वास नाही, तर मेहनतीच्या जोरावर आम्ही बोलत आहोत, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी मेळाव्यानंतर बोलताना व्यक्त केली.

युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केलं. शिवसेना सोबत आली नाही तरीही आपण 48 पैकी 40 जागा जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलाय. निवडणूक होईपर्यंत घरी येणार नाही, असं अगोदरच कुटुंबीयांना सांगून ठेवा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

अमित शाह दररोज एक ते दोन राज्यातील बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. अमित शाहांनी काल त्रिपुराच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, आज दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित राज्यात सभा घेतली, तर त्यानंतर लातूरमध्ये मराठवाड्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.