Amravati Election 2022 : राज्यात सत्तांतर, अमरावती पालिकेत भाजप सत्ता टिकवू शकणार?, जाणून घ्या प्रभाग क्रमांक 10 चं गणित

| Updated on: Jul 25, 2022 | 3:54 PM

अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 10 चं गणित काय?

Amravati Election 2022 :  राज्यात सत्तांतर, अमरावती पालिकेत भाजप सत्ता टिकवू शकणार?, जाणून घ्या प्रभाग क्रमांक 10 चं गणित
Follow us on

अमरावती : राज्यात सत्तांतर झालंय आता सगळ्यांचं लक्ष आहे ते महापालिका निवडणुकांकडे… राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीची तयारी महापालिका आणि राजकीय पक्षांकडून केली जात आहे. अश्यात अमरावती महापालिकेत (ARMC Election 2022 ) यात प्रभागनिहाय मतदार यादी, प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडत आदी महत्त्वाच्या कामांना वेग आला आहे. आपल्याला तिकीट कसं मिळेल, यासाठी नेतेमंडळी तयारीत आहेत. तर राजकीय पक्षांनीही डावपेच आखायला सुरुवात केली आहे. राज्यात मागच्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीचं सरकार होतं. मात्र आता शिंदे गट फुटून भाजपासोबत गेला आहे. त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही दिसून येणार आहे. या गणिताचा फायदा शिवसेनेला होणार, शिंदेगटाला होणार की भाजपला हे येत्या काळात स्पष्ट होईल. अमरावतीत यंदा 98 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यावर्षी एकूण 11 जागा वाढल्या आहेत. अश्यात प्रभाग क्रमांक 10 मधली स्थिती काय आहे? जाणून घेऊयात…

व्याप्ती

जोग स्टेडियम परिसरात हा प्रभाग येतो. खापर्डे बगिचा परिसर, लोकमाता नगर, समाधान नगर, काझी कंपाऊंड, शास्त्रीनगर, टोपे नगर, मोहन मगर, केशव कॉलनी या परिसरात या प्रभागाची व्याप्ती आहे.

आरक्षण- जोग स्टुडिओ

प्रभाग क्रमांक 10 अ अनुसूचित जाती

हे सुद्धा वाचा

प्रभाग क्रमांक 10 ब अनुसीचित जमाती महिला

प्रभाग क्रमांक 10क सर्व साधारण

2017 चे विजयी उमेदवार

प्रभाग  10  अ भाजप- अजय गोंडाणे

प्रभाग  10 ब बहुजन समाज पक्ष- माला योगेश देवकर

प्रभाग  10 क संध्‍या सदाशिव टिकले

प्रभाग  10 ड ऋषी सुरेश खत्री

पक्षउमेदवाराचे नावविजयी
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
पक्षउमेदवाराचे नावविजयी
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
पक्षउमेदवाराचे नावविजयी
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना