AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ARMC Election 2022 Ward No 19 | अमरावती महापालिकेत भाजपचा वरचष्मा. प्रभाग क्रमांक 19 मध्ये कमळ फुलणार की शिवसेना पाडणार खिंडार?

ARMC Election 2022 Ward No 19 | अमरावती महापालिकेत भाजपनं गेल्या निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व स्थापन केले होते. यंदा ही भाजपने जबरदस्त मोर्चेबांधणी केली आहे. ते सत्ता राखण्यात यशस्वी होतात का? ते निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच.

ARMC Election 2022 Ward No 19 | अमरावती महापालिकेत भाजपचा वरचष्मा. प्रभाग क्रमांक 19 मध्ये कमळ फुलणार की शिवसेना पाडणार खिंडार?
शिवसेना पाडणार खिंडार?Image Credit source: TV9marathi
| Updated on: Aug 06, 2022 | 2:06 PM
Share

ARMC Election 2022 Ward No 19 | अमरावतीत (Amravati) हा पश्चिम विदर्भातील राजकीयदृष्ट्या महत्वाचा जिल्हा आहे. ‘झाड झडुले शस्त्र बनेंगे ,भक्त बनेगी सेना ,पत्थर सबही बॉम्ब बनेंगे’ असे स्फुलिंग चेतवणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या या पुण्यभूमीत भाजपने गेल्या महापालिका निवडणुकीत (Municipal Election) जम बसवला. 2012 साली अवघ्या 5-7 नगरसेवकांवर असलेल्या भाजपने (BJP) त्यानंतर संघटनात्मक पातळीवर पक्ष बांधला आणि 2017 च्या निवडणुकीत प्रचंड उलटफेर झाला नी भाजप तब्बल 45 जागांवर विजयी झाला. आता तर भाजपने अमरावतीमधून राज्यसभेवर (Rajya Sabha) डॉ अनिल बोंडे यांना खासदार म्हणून तर विधान परिषदेवर (Legislative Council) प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांना आमदार म्हणून प्रतिनिधीत्व दिले. त्यामुळे स्थानिक पातळीवर भाजपमध्ये उत्साह दुणावला आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचा हा वरचष्मा मोडण्यासाठी स्थानिक पातळीवर काँग्रेसचे (Congress) डॉ. सुनील देशमुख आणि शिवसेना (Shiv Sena) तसेच स्थानिक पातळीवरील गटांची मोर्चेबांधणी सुरु आहेत. त्यात त्यांना कितपत यश येते? भाजपला गड राखता येतो का? शिवसेना, काँग्रेसह अपक्षांना खिंडार पाडता येते का? बच्चू कडू यांची भूमिका काय राहिल? यावर पुढील चित्र स्पष्ट होईल.

प्रभाग क्रमांक 19 मध्ये कोणता भाग?

अमरावती शहरातील मुस्लीम बहुल पठानपूरा, पाटीपूरा, छाया नगर, ताज नगर, मौस नगर, हैदरपूरा, हनुमान नगर, आझाद कॉलनी, खोलापूरी गेट इत्यादी भाग या प्रभागात येतो.

कसे आहे प्राबल्य

अमरावती महपालिकेतील अंतिम प्रभाग रचनेनुसार, येथे 33 प्रभाग असून 98 वॉर्ड असतील. यातील अनुसूचित जातींसाठी 17, अनुसूचित जमातींसाठी दोन आणि महिलांसाठी 39 जागा राखीव आहेत.एकूण 33 प्रभागांपैकी 32 प्रभाग हे तीन सदस्यीय आहेत. तर एक प्रभाग दोन सदस्यांचा आहे. अमरावतीची एकूण लोकसंख्या 6 लाख 47 हजार 057 एवढी आहे. महापालिकेवर सध्या भाजपची सत्ता आहे.

लोकसंख्येचं गणित काय?

अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये एकूण लोकसंख्या 20 हजार 7490 एवढी आहे. येथे पुरुष मतदारांची संख्या एकूण 10,922 इतकी आहे तर स्त्री मतदारांची संख्या 9,826 इतकी आहे.

आधीच्या निवडणुकीचं चित्र काय?

अमरावतीच्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये 2017 मधील निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेवकांची नावे पुढील प्रमाणे-

प्रभाग 19 अ- चेतन विजय गावंडे (भाजप) प्रभाग 19 ब- रेखा ओमप्रकाश भुतडा(भाजप) प्रभाग 19 क- मंजुषा प्रशांत जाधव (शिवसेना) प्रभाग 19 ड- तुषार भारतीय (भाजप) प्रभागात आरक्षण कसे?

अमरावती महापालिकेसाठी आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली आहे. त्यातील चित्र पुढीलप्रमाणे-

प्रभाग 19 अ- सर्वसाधारण महिला प्रभाग 19 ब-सर्वसाधारण महिला प्रभाग 19 क- सर्वसाधारण

अमरावती 2017 मधील पक्षीय बलाबल

भाजप-45 शिवसेना-07 काँग्रेस-15 एमआयएम-10 बसपा-5 रिपाई (आठवले गट)-1 स्वाभिमानी पार्टी-3 अपक्ष- 1 एकूण- 81

पक्ष उमेदवारविजयी/आघाडी
भारतीय जनता पार्टी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
एमआयएम
बसपा
स्वाभिमानी पक्ष
अपक्ष
पक्ष उमेदवारविजयी/आघाडी
भारतीय जनता पार्टी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
एमआयएम
बसपा
स्वाभिमानी पक्ष
अपक्ष
पक्ष उमेदवारविजयी/आघाडी
भारतीय जनता पार्टी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
एमआयएम
बसपा
स्वाभिमानी पक्ष
अपक्ष

Follow Us
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड