आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंसह अनेक नेते नजरकैदेत

| Updated on: Sep 11, 2019 | 10:35 AM

आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे (TDP) अध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि त्यांचा मुलगा लोकेश नाराला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंसह अनेक नेते नजरकैदेत
Follow us on

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे (TDP) अध्यक्ष एन. चंद्रबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि त्यांचा मुलगा लोकेश नाराला नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. टीडीपीने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस. जगनमोहन रेड्डी (Y. S. Jaganmohan Reddy) यांच्या सरकारवर राजकीय हिंसेचा आरोप केला आहे. त्याविरोधात चंद्रबाबू नायडूंनी ‘Chalo Atmakur’ रॅलीचं आवाहन केलं होतं.

चंद्रबाबू नायडू आज (11 सप्टेंबर) एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. चंद्रबाबू यांनी विरोध प्रदर्शनाचं आवाहन केल्यानंतर आंध्र प्रदेश पोलिसांनी टीडीपीच्या अनेक मोठ्या नेत्यांना नजरकैद केलं आहे. पोलिसांनी काही भागात कलम -144 (जमावबंदी) लागू केलं आहे. चंद्रबाबू नायडू यांनी जगनमोहन रेड्डींवर टीडीपीच्या 8 कार्यकर्त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. तसेच अनेक कार्यकर्त्यांना रेड्डी यांच्या पक्षाकडून धोका असल्याचा दावाही नायडूंनी केला.


दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर जगनमोहन रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अनेक झटके दिले आहेत. सत्तेवर आल्यानंतर सर्वात आधी त्यांनी चंद्राबाबूंची विशेष सुरक्षा काढली. चंद्राबाबू राहात असलेल्या ‘प्रजा वेदिका’ या इमारतीवरही हातोडा चालवला. तेलुगू देसम पक्षाने यावर तीव्र आक्षेप घेत, ही सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप केला.

वायएसआर काँग्रेसचे नेते आणि आंध्रचे नगरविकास मंत्री बोत्सा सत्यनारायण यांनी टीडीपीवर हल्ला चढवला होता. तसेच जगनमोहन रेड्डींवर विरोधी पक्षनेते असताना जशी कारवाई झाली होती, तशीच कारवाई चंद्राबाबूंवर होईल, असा इशारा दिला होता.