Anil Parab ED Raid | ईडी कारवायांमुळे भाजप हा रोज खड्ड्यात जातोय, संजय राऊतांचा हल्लाबोल

| Updated on: May 26, 2022 | 11:18 AM

"आम्ही अनिल परबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सूडाच्या कारवाईने आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. तसेच अशा कारवायांमुळे भाजप हा रोज खड्ड्यात जातोय असा राऊतांनी हल्लाबोल केला.

Anil Parab ED Raid | ईडी कारवायांमुळे भाजप हा रोज खड्ड्यात जातोय, संजय राऊतांचा हल्लाबोल
ईडी कारवायांमुळे भाजप हा रोज खड्ड्यात जातोय
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : ईडीने (ED) सकाळपासून अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सात ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आज छापेमारीनंतर काय होणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे. छापेमारीला सुरूवात झाल्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मीडियाशी संवाद साधला. “अनिल परब हे आमचे सहकारी आहेत, तसेच ते कडवट शिवसैनिक देखील आहेत. सध्याची जी कारवाई सुरू आहे, ती राजकीय सूडबुद्धीनं सुरु आहे. ज्याप्रकारचे आरोप ईडीकडून लावले जात आहेत, त्यापेक्षा जास्त गंभीर गुन्हा भाजपच्या लोकांवर आहेत, पण त्यांना कुणी हात लावत नाही. आम्ही अनिल परबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तसेच सूडाच्या कारवाईने आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

आम्ही अनिल परबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत

“आम्ही अनिल परबांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. सूडाच्या कारवाईने आमच्यावर कोणताही दबाव येणार नाही. तसेच अशा कारवायांमुळे भाजप हा रोज खड्ड्यात जातोय असा राऊतांनी हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या राजकारणाला इतकं वाईट वळण कधीच मिळालं नव्हतं. सबळ पुरावे असणाऱ्यांनी जीतू नवलानीला कुणी पळवलं, याचंही उत्तर द्यावं असा सवाल त्यांनी भाजपाला केला. सरकारला त्रास देण्यासाठीच या कारवाया सुरु आहेत. फक्त शिवसेनाला त्रास द्यायचा आणि त्यांना अडचणीत आणण्यासाठी कारवाया करायच्या, असे प्रयत्न सुरु आहेत. मी केलेल्या आरोपांवर आणि दाखल केलेल्या तक्रारींवर अद्याप उत्तर येत नाही. ईडीकडे आम्ही अनेक प्रकरणं पाठवली आहेत. पण ती फाईल उघण्याची तसदीही कुणी घेत नाही. आम्ही पाहून घेऊ” असंही संजय राऊत म्हणाले.

अनिल परबांच्या मुळ गावी निरव शांतता

अनिल परब यांच्या मूळ घरी निरव शांतता आहे. अनिल परब यांचे कणकवली तालुक्यातील हरकुळ गावी त्यांचं मूळ घर आहे.अनिल परब यांच्या 7 मालमत्तांवर छापेमारी सुरू असली. तरी हरकुळ येथील घरी कुठलीच हालचाल नाही. कोणीही ईडीचा किंवा तत्सम अधिकारी इथे आला नसल्याचे नातेवाईकांनी खासगीत सांगितले आहे. अनिल परब यांचे हरकुळ गावी सामायिक घर आहे. चार सख्खे भाऊ व चार चुलत भाऊ यांचं एकत्रीत हे घर आहे.

हे सुद्धा वाचा