तू महिषासुर मर्दिनी, जे जे दुष्ट ते… अरविंद सावंतांची टेंभी नाक्याच्या देवीकडे प्रार्थना काय?

| Updated on: Oct 04, 2022 | 12:02 PM

गेल्या 30 वर्षापासून मी या देवीच्या दर्शनासाठी येत आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब हे अतिशय प्रेमाने वागणारे नेते होते. तसेच ते कडवट शिवसैनिक होते. त्यांनी या देवीची स्थापना केली आणि तेव्हापासून मी या देवीला येणं सुरू केलं.

तू महिषासुर मर्दिनी, जे जे दुष्ट ते... अरविंद सावंतांची टेंभी नाक्याच्या देवीकडे प्रार्थना काय?
अरविंद सावंतांची टेंभी नाक्याच्या देवीकडे प्रार्थना काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, ठाणे: शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या (dussehra rally) पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार अरविंद सावंत (arvind sawant) यांनी शिवसैनिकांमध्ये प्राण फुंकले आहेत. दसरा मेळाव्यासाठी अनेकजण चालत येत आहेत. काही जण बीडवरून येत आहेत. तर काहीजण सोलापूरवरून येत आहे. कुणी ठाण्यावरून चालत येत आहेत. हे कुठं घडतं? हा या मातीचा गुण आहे. रुखीसुखी खायेंगे, पर भगवा झेंडा फडकायेंगे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसैनिकांमध्ये (shivsainik) प्राण फुंकले आहेत. यावेळी त्यांनी देवीकडे साकडं घालत जे जे वाईट आणि दुष्ट आहे, ते धुवून काढण्याची प्रार्थनाही केली.

खासदार अरविंद सावंत ठाण्यात टेंभीनाका येथील देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. कुछ भी खायेंगे, भगवा झेंडा लहरायेंगे. शिवसैनिकांना पंचतारांकीत व्यवस्था लागत नाही. शिवसैनिक हा मातीत बसतो, मातीत खेळतो, असं अरविंद सावंत म्हणाले.

जे भगव्याचे एकनिष्ठ झालेले आहेत, त्यांना हे सोंगढोंग काही लागत नाही. तो फक्त शिवसेनाप्रमुखांचे विचार ऐकतो. एवढेच त्याच्या डोळ्यासमोर असतं, असं सांगतानाच ठाणे वेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. त्यात नको जायला, असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला.

हे सुद्धा वाचा

गेल्या 30 वर्षापासून मी या देवीच्या दर्शनासाठी येत आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब हे अतिशय प्रेमाने वागणारे नेते होते. तसेच ते कडवट शिवसैनिक होते. त्यांनी या देवीची स्थापना केली आणि तेव्हापासून मी या देवीला येणं सुरू केलं, अशी आठवण त्यांनी सांगितली.

आज तिच्या दर्शनासाठी येताना भरपूर आनंद झालाच, परंतु आज तिला साकडे देखील घातलेला आहे की, तू महिषासुर मर्दिनी आहेस. जे जे काही वाईट, दुष्ट आहे ते धुऊन गेलं पाहिजे. देशाच्या राष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने जे जे काही चांगला आहे ते आमच्याकडून करून घे. आमची पावले कुठे वाकडी पडू देऊ नको, असं साकडंही त्यांनी देवीला घातलं.

दसऱ्याला रावणाचं दहन करतात. रावणाची सोन्याची लंका कोणी जाळली? हनुमंताने जाळली. प्रभू रामचंद्रावर निष्ठ होती, निष्ठेने रामाने रावणाला हरवले, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना नाव न घेता लगावला.