ओवैसी पत्नीला म्हणाले, माझ्यावर गोळीबार झाला, पत्नी म्हणाली, डिनरला नसेल न्यायचे तर नका नेऊ, पण बाता नको!

| Updated on: Feb 05, 2022 | 6:01 PM

एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्यावर उत्तर प्रदेशात गोळीबार झाला. त्यांच्या कारवर पाच राऊंड फायरिंग करण्यात आली. या जीवघेण्या हल्ल्यातून ओवैसी थोडक्यात बचावले. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

ओवैसी पत्नीला म्हणाले, माझ्यावर गोळीबार झाला, पत्नी म्हणाली, डिनरला नसेल न्यायचे तर नका नेऊ, पण बाता नको!
असदुद्दीन ओवेसी
Follow us on

नवी दिल्ली: एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी (Asduddin Owaisi) यांच्यावर उत्तर प्रदेशात गोळीबार झाला. त्यांच्या कारवर पाच राऊंड फायरिंग करण्यात आली. या जीवघेण्या हल्ल्यातून ओवैसी थोडक्यात बचावले. उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) मेरठमध्ये ही धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. ही घटना घडल्यानंतर ओवैसी यांनी त्यांच्या पत्नीला याबाबतची माहिती दिली. त्यावर त्यांच्या पत्नीचा विश्वासच बसला नाही. डिनरला (diner) घेऊन जायचं नसेल म्हणून नवा बहाणा करत आहात. नसेल न्यायचं तर नका नेऊ, असं त्या म्हणाल्या. त्यावर ओवैसी यांनी त्यांना टीव्ही पाहण्यास सांगितलं. आपल्यावर हल्ला झाल्याची बातमी टीव्हीवर सुरू असल्याचं ओवैसी यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांच्या पत्नीने टीव्हीवर बातम्या पाहिल्या. तेव्हा कुठं त्यांना आपल्या नवऱ्यावर खरोखरच जीवघेणा हल्ला झाल्याचं समजलं.

मेरठच्या छिजारसी टोल गेट जवळ असदुद्दीन ओवैसी यांच्या कारवर फायरिंग करण्यात आली होती. त्यावेळी ते मेरठवरून दिल्लीला जात होते. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार त्यावेळी ओवैसी यांची पत्नी आणि मुलगी दिल्लीत होते.

ओवैसींनी दिलं होतं आश्वासन

उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. त्यामुळे ओवैसी या निवडणुकीत व्यस्त आहे. निवडणूक प्रचारातून आल्यानंतर संध्याकाळी उशिरा डिनरला घेऊन जाण्याचं आश्वासन ओवैसी यांनी त्यांच्या पत्नीला दिलं होतं. हल्ल्यानंतर ओवैसी दिल्लीत घरी आले तेव्हा त्यांना त्यांची पत्नी डिनरला जाण्यासाठी तयार झालेली दिसली. फायरिंगमुळे गोंधळून गेलेल्या ओवैसी यांनी घडला प्रकार पत्नीला सांगितला. मिळालेल्या माहितीनुसार ओवैसी यांच्या पत्नीचा त्यांच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. डिनरला घेऊन न जाण्यासाठी ओवैसी बहाने बनवत असल्याचं त्यांना वाटलं. मिळालेल्या माहितीनुसार तुम्ही ‘New story’ बनवत आहात, असं त्यांच्या पत्नी म्हणाल्या.

टीव्ही तर सुरू करा

पत्नीला आपल्यावर गोळीबार झाल्याचा विश्वास बसत नसल्याचं पाहून ओवैसींनी टीव्ही तर सुरू करून पाहा, असं त्यांना सांगितलं. त्याचवेळी ओवैसींच्या मुलीचा आईला फोन आला आणि वडिलांवरील हल्ल्याबाबत विचारणा केली. तसेच वडील कसे आहेत हे सुद्धा विचारलं. तेव्हा ओवैसींच्या पत्नीला आपला नवरा खरं बोलत आहे, याची खात्री पटली.

गोली से तो बच गया… लेकिन पत्नी से….

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या घटनेवर ओवैसी यांनी मिश्किल कोटी केली. गोली से बच गया, लेकिन पत्नी की संदिग्ध नज़र से बचना बहुत मुश्किल है, असं ओवैसी म्हणाल्याचं इंडियन एक्सप्रेसने म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

उत्तर प्रदेशातील हल्ल्यानंतर ओवैसींना केंद्र सरकारकडून Z+ सुरक्षा, 36 सुरक्षारक्षक ताफ्याच्या तैनातीत!

Narendra Modi in Hyderabad LIVE : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामी रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचं लोकार्पण, पंतप्रधान हैदराबाद दौऱ्यावर

Lata Mangeshkar health update : लतादीदी आयसीयूत, उपचाराला प्रतिसाद देत आहेत; डॉक्टरांनी दिली माहिती