AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा, बच्चू कडूंना समज द्या, अमोल मिटकरींची मागणी

शिवसेनेच्या (Shiv Sena) पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपसोबत जर पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) आघाडी करत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यांना समज द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं.

अजितदादा, बच्चू कडूंना समज द्या, अमोल मिटकरींची मागणी
Amol Mitkari_Bacchu Kadu
| Edited By: | Updated on: Oct 05, 2021 | 3:11 PM
Share

अकोला : शिवसेनेच्या (Shiv Sena) पाठीत खंजीर खुपसणाऱ्या भाजपसोबत जर पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) आघाडी करत असतील तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यांना समज द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं.

अमोल मिटकरी यांनी आज आपल्या मूळ गावी कुटासा येथे आपल्या पत्नीसोबत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी पालकमंत्री बच्चू कडू यांना समज द्यावी, अशी मागणी केली.

राज्यातर आपण एकत्र आहोत. पण अकोल्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एका उमेदवाराविरोधात बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष भारतीय जनता पक्षासोबत जात असेल, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री बच्चू कडूंना समज द्यावी, असं आमदार अमोल मिटकरी म्हणाले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे.

? कोणत्या जिल्हा परिषदेच्या किती जागांसाठी मतदान?

? धुळे – 15 ? नंदूरबार – 11 ? अकोला – 14 ? वाशिम -14 ? नागपूर -16 ? पालघर पोटनिवडणूक

? नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?

? धुळे -30 ? नंदूरबार -14 ? अकोला -28 ? वाशिम -27 ? नागपूर -31

संबंधित बातम्या  

Amravati DCC Bank Election : अमरावती जिल्हा बँक निवडणूक; विजयानंतर बच्चू कडूंची पाहिली प्रतिक्रिया

ZP and panchayat samiti Election 2021 LIVE : पंचायत समिती, जिल्हा परिषदेसाठी मतदान, मिनी मंत्रालयावर कुणाचा झेंडा?

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...