ZP and panchayat samiti Election 2021 LIVE : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सरासरी 63 टक्के मतदान

Maharashtra Zilla Parishad and Panchayat Samiti Election 2021 LIVE Updates: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे.

ZP and panchayat samiti Election 2021 LIVE : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सरासरी 63 टक्के मतदान
voting

| Edited By: prajwal dhage

Oct 06, 2021 | 1:26 AM

मुंबई : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी 8 वाजता मतदानाला सुरुवात झालीय. सकाळपासून मतदारांचा संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळतोय. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकांकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे.

🛑 कोणत्या जिल्हा परिषदेच्या किती जागांसाठी मतदान?

💠 धुळे – 15 💠 नंदूरबार – 11 💠 अकोला – 14 💠 वाशिम -14 💠 नागपूर -16 💠 पालघर पोटनिवडणूक

🛑 नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?

💠 धुळे -30 💠 नंदूरबार -14 💠 अकोला -28 💠 वाशिम -27 💠 नागपूर -31

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 05 Oct 2021 11:12 PM (IST)

  अकोला जिल्ह्यात दिवसभरात 61.61 टक्के मतदान 

  अकोला : अकोला जिल्ह्यात दिवसभरात झालेले मतदान

  सकाळी 7:30 ते 5 : 30 पर्यंत एकूण मतदान 61.61 टक्के

 • 05 Oct 2021 09:03 PM (IST)

  जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत सरासरी 63 टक्के मतदान

  धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम, नागपूर तसेच पालघर येथे जिल्हापरिषद तसेच पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या. आज दिवसभरात या पाचही जिल्हा परिषदांंमध्ये सरासरी 63 टक्के मतदान झाले आहे. उद्या मतमोजणी होणार असून कोणाची सरशी होणार ते स्पष्ट होईल.

 • 05 Oct 2021 08:00 PM (IST)

  नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत 65.98 टक्के मतदान

  नंदुरबार जिल्हा-

  जि.प./पं.स.पोटनिवडणूक 2021

  एकूण मतदार- 282387

  झालेली मतदानाची आकडेवारी स.7.30 ते संध्या. 5.30 पर्यंत ( अंदाजित ) -

  स्त्री मतदान - 90711

  पुरुष मतदान -95611

  एकूण मतदान -186322

  टक्केवारी - 65.98%

 • 05 Oct 2021 06:32 PM (IST)

  पुण्यातील लोहगाव विमानतळ 15 दिवस राहणार बंद 

  पुणे : पुण्यातील लोहगाव विमानतळ 15 दिवस राहणार बंद

  - विमानतळावरील धावपट्टीच्या कामासाठी विमानतळावरील प्रवासी उड्डाण बंद राहणार

  - 16 ते 30 ऑक्टोबरदरम्यान प्रवासी उड्डाणे होणार नाहीत

  - आधीपासून बुकिंग असलेल्या प्रवाशांना होणार मनस्ताप

 • 05 Oct 2021 05:54 PM (IST)

  नागपूरमध्ये दुपारी 3.30 वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघात 50.51% मतदान

  नागपूर जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत जिल्हा परिषदेच्या  16 मतदारसंघात 50.51% मतदान

  तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघात 50.21% मतदान  झाले आहे.

 • 05 Oct 2021 05:11 PM (IST)

  पालघर जिल्हापरिषद पोट निवडणूक, तीन वाजेपर्यंत 51. 15 टक्के मतदान

  पालघर जिल्हापरिषद पोट निवडणूक

  जिल्हापरिषदेच्या 15 तर 14 गणांसाठी जिल्ह्यात 7:30 ते 3: 30 पर्यंत 51. 15 टक्के मतदान

  डहाणू तालुक्यातील बोर्डी, कासा, सरावली व वनई गटात सकाळी 7:30 ते 11: 30 पर्यंत 54.77 % मतदान

  सरावली आणि ओसरविरा गणात 46.78 टक्के मतदान

  तलासरी तालुक्यातील उधवा गटात 60.15 टक्के मतदान

 • 05 Oct 2021 05:09 PM (IST)

  नागपुरात मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी, मतदानाचा वेग वाढला

  नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणूक

  सायंकाळी मतदारांचा वेग वाढला

  मतदान केंद्रावर काहीशी गर्दी

 • 05 Oct 2021 05:03 PM (IST)

  पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 51.15 टक्के मतदान

  पालघर जिल्हा-

  जि.प./पं.स.पोटनिवडणूक 2021

  स.7.30 ते 3.30 पर्यंत -झालेल्या मतदानाची ऐकून टक्केवारी- 51.15%

 • 05 Oct 2021 04:34 PM (IST)

  वाशिम जिल्ह्यातील मतदानाची स्थिती

  वाशिम : जि.प./पं.स.पोटनिवडणूक

  एकूण मतदार- 351257

  सकाळी 7.30 ते दु. 3.30 पर्यंत

  स्त्री मतदान - 78149

  पुरुष मतदान -88228

  एकूण मतदान -166377

  आतापर्यंत टक्के - 47.37

 • 05 Oct 2021 04:34 PM (IST)

  नंदुरबारमध्ये आतापर्यंत किती टक्के मतदान झाले ?

  नंदुरबार जिल्हा-

  जि.प./पं.स.पोटनिवडणूक 2021

  एकूण मतदार- 282387

  झालेली मतदानाची आकडेवारी स.7.30 ते दु. 3.30 पर्यंत -

  स्त्री मतदान - 76378

  पुरुष मतदान -76971

  एकूण मतदान -153349

  टक्केवारी - 54.30%

 • 05 Oct 2021 04:33 PM (IST)

  वाशिम जिल्हापरिषद पोटनिवडणुकीत आतापर्यंत किती टक्के मतदान ?

  वाशिम जिल्हापरिषद पोटनिवडणुक

  7:30 ते 3:30 वाजेपर्यंतचे मतदान

  एकूण मतदान टक्केवारी-47.37

  सकाळी 7 : 30 ते 12 पर्यंत - 27 टक्के मतदान झाले होते

  दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान -20 टक्के मतदान झाले

 • 05 Oct 2021 04:21 PM (IST)

  पालघर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, आतापर्यंत 46.09 टक्के मतदान

  पालघर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

  दुपारी 1.30 वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची ऐकूण टक्केवारी-- 46.09 %

 • 05 Oct 2021 03:04 PM (IST)

  अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मतमोजणी, फटाके फोडण्यावरुन पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद

  अमरावती जिल्ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेची मतमोजणी आज सकाळपासून गाडगे महाराज सभागृहात सकाळपासून सुरू झाली

  दुपारी 2 वाजताच्या सुमारास सहकार पॅनलचे काही कार्यकर्ते आंनदोस्तव साजरा करीत असताना पोलिसांनी त्यांना हटकले आणि या कारणावरुन पोलीस आणि कार्यकर्ता यांच्यात वाद सुरु झाला

 • 05 Oct 2021 11:48 AM (IST)

  नंदूरबारमध्ये सकाळी 9.30 पर्यंत 10 टक्के मतदान

  जि.प./पं.स.पोटनिवडणूक 2021 एकूण मतदार- 282387 झालेली मतदानाची आकडेवारी स.7.30 ते 9.30 पर्यंत - स्त्री मतदान - 13153 पुरुष मतदान -17302 एकूण मतदान -30455 टक्केवारी - 10.78%

 • 05 Oct 2021 10:57 AM (IST)

  नंदूरबार जिल्हा परिषदेसाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह, मतदान केंद्रांवर मोठ्या रांगा

  नंदुरबार जिल्हा परिषदेच्या 11 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 14 गणांसाठी होणाऱ्या मतदान मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला असून जिल्ह्यातील सर्वच गटात सकाळपासूनच मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असल्याने या निवडणुकीत मतदानाची आकडेवारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढलेली टक्केवारी नेमके कोणाच्या बाजूने राहणार हा औत्सुक्याचं आहे.

 • 05 Oct 2021 09:27 AM (IST)

  अकोला जिल्हात मतदानाला सुरुवात

  अकोला जिल्ह्यात १४ जिल्हा परिषद निवडणुक विभाग व २८ पंचायत समिती गणात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदानाला सुरवात झाली आहे. या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व सज्जता केली असून यानिवडणूकीत तीन लाख ७१ हजार ६९० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १४ निवडणूक विभागांमध्ये ६८ उमेदवार तर पंचायत समितीच्या २८ गणांमध्ये ११९ उमेदवार निवडणूक लढवत आहेत

 • 05 Oct 2021 09:21 AM (IST)

  वाशिमचं चित्र कसं?

  वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 गटासाठी तर पंचायत समितीच्या 27 गणासाठी मतदान सुरुवात झाली आहे... जिल्हा परिषदेच्या 14 गटासाठी 82 उमेदवार रिंगणात असून,पंचायत समितीच्या 27 गणासाठी 135 उमेदवार रिगणात आज सकाळपासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केली आहे...जिल्ह्यात सोयाबीन चा हंगाम सुरू असल्याने सकाळपासून च मतदान केंद्रावर मोठ्याप्रमाणात रांगा लागल्याच दिसून येत आहे

 • 05 Oct 2021 09:20 AM (IST)

  धुळे नंदूरबारमध्ये चित्र कसं?

  खान्देशात २५ गट, ४१ गणांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते आहे..धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रिक्त जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज दोन्ही जिल्ह्यात मतदान होणार आहे. यात दोन्ही जिल्ह्यातील २५ गटांसाठी ८३ उमेदवार तर ४१ गणांसाठी १११ उमेदवार नशिब आजमावत आहेत

 • 05 Oct 2021 09:19 AM (IST)

  धुळ्यात सकाळपासून मतदान केंद्रावर गर्दी

  धुळ्यात सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी बघायला मिळते आहे. धुळ्यात 15 गट आणि 30 गणांसाठी आज निवडणूक होते आहे. दरम्यान धुळ्यात थेट मविआ विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे.

 • 05 Oct 2021 09:18 AM (IST)

  वाशिमच्या जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होणार- चंद्रकांत ठाकरे

  वाशिम जिल्हा परिषदेमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा अध्यक्ष होऊ नये यासाठी विरोधक प्रयत्न करत आहे, पण आम्ही त्यांचा प्रयत्न हाणून पाडू

  14 पैकी 11 जागा राष्ट्रवादी जिंकणार

  महाविकास आघाडी म्हणून लढण्याचा प्रयत्न केला पण जमलं नाही तरी देखील निवडणूक नंतर महाविकास आघाडी प्रमाणे एकत्र येत सत्ता स्थापन करु- चंद्रकांत ठाकरे

 • 05 Oct 2021 08:18 AM (IST)

  औरंगाबादेत येत्या चार पाच दिवसात जोरदार पावसाची शक्यता

  औरंगाबाद -

  येत्या चार पाच दिवसात जोरदार पावसाची शक्यता..

  नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासकांचे आवाहन..

  हवामान खात्याने राज्यात पुढील चार,पाच दिवसात काही ठिकाणी गडगडाटा सहित जोरदार पावसाची श्यक्यता..

  उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी सतर्क राहण्याचे आदेश..

  राज्यात आगामी 4 ते 5 दिवस असणार पावसाचे..

 • 05 Oct 2021 08:18 AM (IST)

  काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अनिल देशमुख यांना धक्का

  - काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अनिल देशमुख यांना धक्का

  - भाजप समर्थित पॅनलचे १८ पैकी १४ जागांवर विजय

  - भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंच्या नियोजनाचं मोठं यश

  - अनिल देशमुख यांची अनुपस्थितीचा राष्ट्रवादीला फटका

  - नरखेड APMC मध्ये महाविकास आघाडीला मोठं यश

  - नरखेड बाजार समितीत १८ पैकी १० जागांवर महाविकास आघाडीचा विजय

  - कळमेश्वर बाजार समितीत सुनील केदार गटाचा विजय

 • 05 Oct 2021 08:17 AM (IST)

  नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

  - नाशिक शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ

  - महिनाभरात 65 दुचाकी चोरीला,22 लूटमार,17 घरफोड्या,6 सोनसाखळी चोरीच्या घटना

  - नागरिकांमध्ये भीतीच वातावरण

  - चोरट्याना रोखण्याचा पोलिसांसमोर आव्हान

  - पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी आता कडक पाऊल उचलण्याची गरज

 • 05 Oct 2021 08:17 AM (IST)

  रेल्वे स्टेशन जवळच्या तुकारामशेठ शिंदे वाहनतळाचा तळमजला पूर्ण पाण्याखाली

  पुणे

  रेल्वे स्टेशन जवळच्या तुकारामशेठ शिंदे वाहनतळाचा तळमजला पूर्ण पाण्याखाली

  वाहनतळालात लावण्यात अलेलल्या सुमारे 300 ते 400 दुचाकींचे नुकसान

 • 05 Oct 2021 08:16 AM (IST)

  3 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे यांची कारागृहात रवानगी

  - 3 लाख रुपयांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे यांची कारागृहात रवानगी

  - 3 दिवसांची पोलीस कोठडी संपल्या नंतर न्यायालयात हजर केलं असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

  - नाशिकच्या देवळाली कॅम्प येथील फ्लॅटवर आय.पी.एल क्रिकेट मॅचचे बेटिंग सुरू असल्याबाबत तक्रारी येत असल्याचे सांगून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल न होऊ देण्यासाठी मागण्यात आली होती 4 लाख रुपयांची लाच

  - 3 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ केली होती अटक

  - महेश शिंदे हे नाशिक ग्रामिण मध्ये स्थानिक गुन्हे शाखे मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत

 • 05 Oct 2021 08:13 AM (IST)

  पालघर जिल्ह्यात मतदानाला सुरुवात

  पालघर जिल्ह्यात सकाळी बरोबर 7.30 वाजता मतदानाला सुरवात झाली आहे

  भाताने जि परिषद शाळेच्या मतदान केंद्रावर सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदारांच्या रांगा लागल्या आहेत

  सकाळी कामावर जाणारे मतदार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहचले आहेत

  बोईसर विधानसभेचे आ राजेश पाटील यांनी भाताने पंचायत समिती गणात पहिले मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

  लोकशाही बळकट करण्यासाठी, आपल्या पसंदीच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान करावे असे अवाहन आ पाटील यांनी केले.

 • 05 Oct 2021 08:12 AM (IST)

  वाशिमच्या ग्रामीण भागात सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा

  वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषद 14 जागे साठी तर पंचायत समितीच्या 27 गणा साठी आज मतदानाला सुरुवात झाली असून असून जिल्हा परिषद साठी 82 तर पंचायत समिती साठी 135 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामीण भागात सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे दिसून येत आहे. वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील कासोळा मतदान केंद्रावर सुद्धा मतदानाला सुरुवात झाली आहे. कासोळा पंचायत समिती गणासाठी मतदान पार पडत आहे.

 • 05 Oct 2021 08:11 AM (IST)

  पालघरच्या नंडोरे मतदान केंद्रावर मतदानाचा पहिला मान 'महिला फर्स्ट'

  पालघर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. पालघर तालुक्यातील नंडोरे मतदान केंद्रावर पहिला मतदान करण्याचा मान महिलेला मिळाला आहे. कायदा सुव्यवस्था व अनुचित प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस प्रशाशनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Published On - Oct 05,2021 8:07 AM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें