AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती न दिल्यामुळे आमदार नाराज, स्थानिक राजकारण्यांनी डावलल्याचा आरोप

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर माझी नाराजी नाही मात्र स्थानिक राजकारणी आणि प्रशासनाने दौऱ्यात स्थानिक आमदाराला बोलावलं नाही," असे म्हणत भाजप आमदार बंटी भांगडीया यांनी नाराजी व्यक्त केली. (Banti Bhangdiya Uddhav Thackerays)

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची माहिती न दिल्यामुळे आमदार नाराज, स्थानिक राजकारण्यांनी डावलल्याचा आरोप
| Updated on: Jan 08, 2021 | 3:28 PM
Share

नागपूर :मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर माझी नाराजी नाही मात्र स्थानिक राजकारणी आणि प्रशासनाने दौऱ्यात स्थानिक आमदाराला बोलावलं नाही,” असा आरोप करत भाजप आमदार बंटी भांगडीया यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विदर्भ दौऱ्यावर होते. मात्र, ठाकरेंच्या दौऱ्याविषयी बंटी भांगडीया (Banti Bhangdiya) यांना कळवण्यात आले नव्हते. याच कारणामुळे त्यांनी नाराजी व्यक्त करत जनतेच्या प्रश्नांवर राजकारण केलं जात असल्याचा आरोप केला. (Banti Bhangdiya criticises chief minister Uddhav Thackerays vidarbha visit)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी गोसीखुर्द धरण आणि परिसरातील सिंचन व्यवस्थेची पाहणी केली. मात्र ठाकरेंच्या या दौऱ्याबद्दल प्रशासन आणि स्थानिक राजकारण्यांनी कुठलीही माहिती न दिल्याचा आरोप भाजप आमदार बंटी भांगडीया यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा दौऱ्याबद्दलची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून मिळायला हवी होती. मात्र ती मला माध्यमातून कळत आहे. याबाबत प्रशासनाला विचारले असता आम्ही तुम्हाला का बोलावलं नाही, हे तुम्ही समजू शकता अशा प्रकारचे उत्तरं दिली जात आहेत, असे भांगडीया म्हणाले. तसेच त्या भागातील राजकारण्यांनी मुद्दामहून डावलल्याचा आरोप बंटी भांगडीया यांनी केला.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्या मतदारसंघात पाहणी करत आहेत. त्या भागातील प्रश्न मला माहीत आहेत. मी शेतकऱ्यांची व्यथा मुख्यमंत्र्यांना सांगू शकलो असतो. मात्र मला डावलण्यात आल्याची तक्रार भागंडीया यांनी केली. तसेच या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना सांगणार आहे. घडलेल्या प्रकाराविषयी पत्रव्यवहार पण करणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. अशा प्रकारे जनतेच्या प्रश्नांवर राजकारण करायला नको होतं असे म्हणत त्यांनी तेथील स्थानिक नेत्यांवर टीका केली.

संबंधित बातम्या :

हे तर घटनेचे मारेकरी, राज्यपालांचं नाव न घेता राऊतांची टीका

शिवसेनेला मुंबईत जशास तशी टक्कर देण्याची काँग्रेसची तयारी! भाई जगतापांच्या हाती कोणती सूत्रं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरींचा तो फोटो व्हायरल, तर्कवितर्कांना उधाण

(Banti Bhangdiya criticises chief minister Uddhav Thackerays vidarbha visit)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...