हे तर घटनेचे मारेकरी, राज्यपालांचं नाव न घेता राऊतांची टीका

काही लोक आम्हाला घटनेविषयी ज्ञान देतात. घटनात्मक पदावर बसलेल्यांनी आधी घटना पाळायला हवी," अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. (Sanjay Raut bhagatsingh Koshyari)

हे तर घटनेचे मारेकरी, राज्यपालांचं नाव न घेता राऊतांची टीका
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि संजय राऊत
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 2:23 PM

नाशिक : “विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मुद्दामहून प्रलंबित ठेवला आहे. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय राज्यपालांसाठी बंधनकारक असतो.  काही लोक आम्हाला घटनेविषयी ज्ञान देतात. घटनात्मक पदावर बसलेल्यांनी आधी घटना पाळायला हवी,” अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्यावर त्यांचे नाव घेता केली. तसेच, विधनापरिषदेच्या 12 जागा 10 महिने झाले तरी रिकाम्या कशा ठेवू शकता असे विचारत घटनात्मक पदावर बसून घटनेचे मारेकरी होत आहात का? असा बोचरा सवाली राऊत यांनी राज्यपालांना केला. भाजप नेते वसंत गीते (Vasant Gite) आणि सुनील बागुल (Sunil Bagul) यांनी आज (8 जानेवारी) संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी राऊत माध्यमांशी बोलत होते. (Sanjay Raut criticize governor bhagatsingh Koshyari vidhan parishad MLA)

हा तर संविधानाच अपमान 

“राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्यांवर अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. जूनमध्ये या निवडणुका व्हायला हव्या होत्या. मात्र, त्या झाल्या नाहीत. आमदारांच्या नियुक्त्यांवर आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे. 12 सदस्यांच्या नियुक्त्या न होणं हा संविधानाच अपमान आहे. मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय राज्यपालांसाठी बंधनकारक असतो. विधानपरिषदेसाठीच्या राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मुद्दामहून प्रलंबित ठेवला आहे,” असं राऊत म्हणाले. तसेच, नियुक्त्या न होणं हा विधिमंडळाचा अपमान असल्याचंही राऊत म्हणाले.

लोकांच्या भावनेवर निर्णय घ्यायचा नाह असं कुठेही लिहलेलं नाही

“किमान समान कार्यक्रम हा अन्न, वस्त्र, निवारा आणि विकास याबाबत आहे. तसेच, समान कार्यक्रम हा विकासाबाबत आहे. लोकांच्या भावनेबाबत निर्णय घ्यायचा नाही, असं समान कार्यक्रमात कुठेही लिहलेलं नाही,” असे मोठे विधान राऊत यांनी केलं. तसेच बिहारमध्येही एक औरंगाबाद आहे. हे नाव बदलण्याबाबत भाजपची काय भूमिका काय आहे?, असा सवाल राऊत यांनी केला. तसेच, आम्ही औरंगाबादचं संभाजीनगर करणार असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी येवेळी केला.

संबंधित बातम्या :

बागुल, गीतेंच्या प्रवेशानंतर शिवसेनेची भगवी शाल उबदार, तेजस्वी होणार? संजय राऊत म्हणाले…

शिवसेनेला मुंबईत जशास तशी टक्कर देण्याची काँग्रेसची तयारी! भाई जगतापांच्या हाती कोणती सूत्रं?

उद्धव ठाकरेंची पहिली कठोर कारवाई, महेश कोठेंची कायमची हकालपट्टी

(Sanjay Raut criticize governor bhagatsingh Koshyari vidhan parishad MLA)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.