उद्धव ठाकरेंची पहिली कठोर कारवाई, महेश कोठेंची कायमची हकालपट्टी

शिवसेना नगरसेवक महेश कोठे (Mahesh Kothe) यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरेंची पहिली कठोर कारवाई, महेश कोठेंची कायमची हकालपट्टी
महेश कोठे
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 12:19 PM

सोलापूर : शिवसेना नगरसेवक महेश कोठे (Mahesh Kothe) यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या आदेशानुसार महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केल्याची माहिती, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. महेश कोठे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मात्र महाविकास आघाडीत कुरबूर नको म्हणून त्यांचा प्रवेश लांबणीवर पडल्याचं वृत्त होतं. त्यानंतर लगेचच कोठे यांची हकालपट्टी केल्याची माहिती पुरुषोत्तम बरडे यांनी दिली. (Uddhav Thackeray sacks Mahesh Kothe from Shiv Sena)

राष्ट्रवादी प्रवेश लांबणीवर

शिवसेना नगरसेवक महेश कोठे (Mahesh Kothe) यांचा राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश लांबणीवर पडला आहे. कोठे यांचा आज सकाळी 11 वाजता पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत प्रवेश नियोजित होता. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांच्या अंतर्गत खलबतांनंतर कोठेंचा प्रवेश लांबणीवर पडला आहे. महाविकास आघाडीत वाद नको म्हणून प्रवेश लांबणीवर गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

महेश कोठे

महेश कोठे हे सोलापूर महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नगरसेवक आहेत. कोठे हे आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार होते. खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार नियोजित होता. मात्र महाविकास आघाडी करुन सत्तेत आलेले शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष फोडाफोडी टाळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सत्तेत एकत्र असताना मित्रपक्षातील नेते फोडणे हे आघाडीला धोकादायक असल्याचं वरिष्ठांचं म्हणणं आहे. त्याचीच प्रचिती पारनेर नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे समोर आला होता.

अहमदनगरच्या पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते. तेव्हादेखील अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला होता. तेव्हा उद्धव ठाकरे प्रचंड संतापले होते.

यानंतर शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याकडून अजित पवार यांना फोन करून निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता. सत्तेतील मित्रपक्ष एकमेकांचे लोकप्रतिनिधी फोडायला लागले, तर योग्य संदेश जाणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक परत शिवसेनेत पाठवावेत, असा निरोप उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांना धाडला होता. अखेर या बंडखोर नगरसेवकांनी ‘मातोश्री’वर येऊन हातात पुन्हा शिवबंधन बांधले होते.

त्यानंतर महेश कोठेंसारखे सोलापुरातील बडे नेते खुद्द शरद पवारांच्या उपस्थितीत शिवसेनेतून राष्ट्रवादीत दाखल होणार होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर उद्धव ठाकरे यांनी महेश कोठेंची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी केली.

(Solapur Shivsena leader Mahesh Kothes NCP entry postponed)

संबंधित बातम्या 

शिवसेनेच्या ‘त्या’ इशाऱ्यानंतरही राष्ट्रवादीकडून ‘पारनेर पॅटर्न’ची पुनरावृत्ती; आता उद्धव ठाकरे काय करणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.