AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhagyashree Ganesh Aarti controversy: राजकुमाराऐवजी राजकन्या भाग्यश्रीने केली आरती, लाडकी लेक देखील मैदान, थेट फोटो…

Bhagyashree Ganesh Aarti controversy: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि राजकन्या भाग्यश्री या चांगल्याच चर्चेत आहेत. त्यांनी राजकुमाराच्या ऐवजी आरती करण्याचा मान घेतला आणि मोठा वाद सुरु झाला. आता या वादात भाग्यश्री यांच्या लेकीने उडी घेतली आहे.

Bhagyashree Ganesh Aarti controversy: राजकुमाराऐवजी राजकन्या भाग्यश्रीने केली आरती, लाडकी लेक देखील मैदान, थेट फोटो...
Bhagyashree PatwardhanImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 8:24 AM
Share

गणेशोत्सवात सांगलीतील ऐतिहासिक श्री गणपती पंचायत संस्थानच्या आरतीचा वाद चव्हाट्यावर आला. पटवर्धन राजघराण्यातील हा मतभेद सांगलीसह संपूर्ण सिनेसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे. तब्बल चार वर्षांनंतर श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांची कन्या आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन दासानी यांनी मंदिरात येऊन आरतीचा मान घेतला. युवराज आदित्यराजे पटवर्धन उत्तराधिकारी असतानाही त्यांना डावलून भाग्यश्रींना हा मान मिळाल्याने वाद उफाळला.

या संपूर्ण प्रकरणात भाग्यश्री यांची लेक अवंतिका दासानी हिची इन्स्टाग्राम पोस्ट सध्या नेटकऱ्यांच्या लक्षवेधक ठरली आहे. अवंतिकाने नुकतेच सांगलीच्या मंदिरातील काही खास फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. या फोटोंमध्ये भाग्यश्री आणि अवंतिका दोघीही श्री गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर दिवा लावताना दिसत आहेत. अवंतिकाने या प्रसंगी आकर्षक पिवळ्या रंगाची साडी नेसली होती, तर भाग्यश्री यांनी जांभळ्या रंगाची काठापदराची साडी परिधान केली होती. मंदिराच्या आवारात आई-मुलींची ही उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेत आहे.

अवंतिकाने शेअर केले फोटो

अवंतिकाने या फोटोंसोबत एक भावपूर्ण कॅप्शन दिले आहे, ‘बाप्पाचा हात अन् आईची साथ.’ ती पुढे म्हणते, “मी तिच्या बाजूला उभी आहे आणि नेहमीप्रमाणेच आजही ती मला शिकवत आहे. गणपती बाप्पा यांच्या (माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी) कृपाशीर्वादाने आम्ही प्रगतीपथावर नेहमी पुढे जात राहू. ठिकाण – सांगली.”

View this post on Instagram

A post shared by Avantika (@avantikadassani)

अवंतिकाने ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अवंतिका स्वतः अभिनेत्री आहे. तिने २०२२ मध्ये ‘मिथ्या’ या वेब सिरीजमधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. आईच्या पाठिंब्याचे दर्शन घडवणाऱ्या या पोस्टमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आई-मुलींचा हा एकत्रित क्षण आणि अवंतिकेचा आईच्या समर्थनार्थ केलेला हा भावपूर्ण संदेश सध्या सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...