शिंदे गट, भाजप आणि मनसे युती होणार? चंद्रकांत पाटील यांनी क्लिअरच सगळं सांगितले, म्हणाले…

शिंदे गट, भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गट, भाजप आणि मनसे युती होणार? चंद्रकांत पाटील यांनी क्लिअरच सगळं सांगितले, म्हणाले...
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2022 | 11:42 AM

मुंबई : मागील काही दिवसांपासून शिंदे गट, भाजप आणि मनसे यांच्यांतील जवळीक वाढत आहे. शिवतीर्थावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तिन्ही एकाच मंचावर उपस्थित होते. यामुळे शिंदे गट, भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच मनसे आमदार राजू पाटील यांनी चर्चेला खतपाणी घालणारे वक्तव्य केले आहे. शिंदे गट, भाजप आणि मनसे युतीच्या चर्चेबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप, मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव असेल तर महाराष्ट्रात भाजपच्या कोर कमिटीचे सदस्य बसून निर्णय करतात असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

शिंदे गट, भाजप आणि मनसे युतीच्या चर्चे विषयी कोर कमिटीची कोणतीही बैठक झालेली नाही. असा कोणताही प्रस्ताव चर्चेला आला नाही. त्यामुळे ज्या प्रस्तावाची चर्चाच नाही त्या प्रस्तावाबद्दल मी काय बोलणार असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

आमची सर्वांची मन जुळलेली आहेत फक्त वरतून तारा जुळले की सर्व जुळून येईल असे विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे. महायुती झाल्यास सगळ्यांनाच आनंद तसेच फायदा होईल असं केंद्रीय मंत्री कपील पाटील म्हणाले.