AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीच्या चौकशीचा राजकारणाशी संबंध लावणे चुकीचे, खसडेंनी चौकशीला सामोरे जावे: प्रवीण दरेकर

ईडी चौकशी आणि छापेमारी यांचा संबंध राजकारणाशी लावणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीवर संशय आल्यावर कारवाई होत असते. (pravin darekar)

ईडीच्या चौकशीचा राजकारणाशी संबंध लावणे चुकीचे, खसडेंनी चौकशीला सामोरे जावे: प्रवीण दरेकर
pravin darekar
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 5:39 PM
Share

मुंबई: ईडी चौकशी आणि छापेमारी यांचा संबंध राजकारणाशी लावणे चुकीचे आहे. एखाद्या व्यक्तीवर संशय आल्यावर कारवाई होत असते, असं सांगतानाच मूळ विषयापासून पळ न काढता एकनाथ खडसे यांनी चौकशीला सामोरे जावे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे. (bjp leader pravin darekar reaction on eknath khadse’s ed probe)

प्रवीण दरेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. माझ्यावरील कारवाईमागे राजकीय सुडाचा वास आहे, मी भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यानेच माझी चौकशी सुरू आहे, असं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यावर दरेकर यांनी पलटवार केला आहे. ईडीची कारवाई कोणत्याही सुडभावनेने होतं नसते. तपास यंत्रणा स्वायत्त असून त्यांच्या पद्धतीने ते काम करतात. त्यामुळे यामध्ये विनाकारण राजकारण करत मूळ विषयापासून पळ न काढता खडसे यांनी चौकशीला समोरं जायला हवं, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

निर्दोषत्व सिद्ध करा

कुठलीही व्यक्ती चौकशीपासून पळ काढून आपल्या बचावाकरीता मार्ग शोधत असते. तेव्हा या सर्व प्रकरणातून संशयाला बळकटी मिळते. आपला जर दोष नसेल तर योग्य ती कागदपत्र सादर करून आपलं निर्दोषत्व सिद्ध करा. तसेच कोणत्याही चौकशीला सहकार्य करणं उत्तम ठरेल, असा सल्लाही दरेकर यांनी म्हटलं आहे.

मी ईडीचा प्रवक्ता नाही

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये होते. त्यांनीही ईडीकडून खडसेंची चौकशी होत असल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत जे काही बोलायचं ते ईडी बोलेल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे सुडाने काम करण्याची प्रथा नाही, असं फडणवीस म्हणाले.

खडसेंचा थेट भाजपवर आरोप

ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपवर थेट आरोप केला होता. या कारवाईमागे राजकीय सुडाचा वास येतोय. मी पक्ष बदलला. भाजपसोडून राष्ट्रवादीत आलो. त्यानंतर माझ्या चौकश्या सुरू झाल्या. राजकीय हेतूने ही कारवाई सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू आहे, असं सांगतानाच जळगावमध्ये व्हॉट्सअॅपवर भाजप कार्यकर्त्यांच्या ग्रुपवर अभी कुछ होनेवाला है असा मेसेज फिरत आहे. यातून हे सर्व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. पण मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असं खडसे म्हणाले.

पाचवेळा चौकशी केली

ही जमीन एमआयडीसीची नाही. ती खासगी जमीन आहे. एमआयडीसीने हा भूखंड संपादित केलेला नाही. त्याचा मोबदला दिलेला नाही. ताबाही दिलेला नाही. आम्ही सर्व खासगी व्यवहार केले आहेत. मी भूखंड खरेदी केला तेव्हा त्यावर मूळ मालकाचं नाव होतं. हे मी वारंवार सांगितलं आहे. या प्रकरणी पाच वेळा चौकशी झाली. अँटी करप्शन ब्युरोनेही चौकशी केली. आरोपात काही तथ्य नसल्याचा अहवालही त्यांनी दिला आहे. अजून किती वेळा चौकशी करणार आहात?, असा सवाल खडसे यांनी केला. (bjp leader pravin darekar reaction on eknath khadse’s ed probe)

संबंधित बातम्या:

VIDEO: खडसे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात, फडणवीस त्यावर नेमकं काय म्हणाले?

माझ्यावरील कारवायांमागे राजकीय सुडाचा वास; एकनाथ खडसेंचा भाजपवर थेट आरोप

खडसे राष्ट्रवादीत आल्यानेच भाजपकडून चिडून केंद्रीय एजन्सीचा गैरवापर; जयंत पाटलांचा आरोप

(bjp leader pravin darekar reaction on eknath khadse’s ed probe)

Follow Us
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश