AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कामाचा माणूस हेरुन पक्षात घ्या, भाजपला एक नंबरचा पक्ष करा, दानवेंचा कार्यकर्त्यांना बुस्टर डोस

भाजपला वाढवायचं असेल तर, कामाचा माणूस हेरुन त्याला पक्षात घ्या. काम करुन भाजपला एक नंबरचा पक्ष बनवा असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना केले.

कामाचा माणूस हेरुन पक्षात घ्या, भाजपला एक नंबरचा पक्ष करा, दानवेंचा कार्यकर्त्यांना बुस्टर डोस
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:58 PM
Share

औरंगाबाद : भाजपला वाढवायचं असेल तर, कामाचा माणूस हेरुन त्याला पक्षात घ्या. काम करुन भाजपला एक नंबरचा पक्ष बनवा असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना केले आहे. देशात जवळपास 15 ते 16 राज्यात भाजपची सत्ता. पंतप्रधान आपले आहेत. कार्यकर्ता बनायचं असेल तर कष्ट करण्याची तयारी ठेवायला हवी असे म्हणत बुस्टर डोसही दानवे यांनी भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना दिला. ते युवा मोर्चाच्या कार्यक्रमात बोलत होते. (BJP Leader Raosaheb Danve appeals Young workers for active participation in aurangabad)

यावेळी दानवे यांनी मराठवाड्यातील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले,” देशात जवळपास 15 ते 16 राज्ये आपले आहेत. तसेच पंतप्रधानही आपले आहेत. मनातला कार्यकर्ता बनायचे असेल तर काम केले पाहीजे. कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. सर्वांनी पक्षाच्या कामाचा माणूस हेरुन त्याला पक्षात घ्यायला पाहीजे. ” तसेच, राजकारणात भविष्य कोणालाच नसतं; भविष्य आपल्यालाच आपलं भविष्य घडवायचं असतं असा सल्लादेखील यावेळी त्यांनी युवा कार्यकर्त्यांना दिला.

ग्रामपंचायतीच्या निवडणुका सर्वात महत्त्वाच्या

रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचे आवाहन केले. राज्यात येणाऱ्या निवडणुकांपैकी सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायतीची निवडणूक आहे. ग्रामपंचायतीसाठी भाजप पक्षाची रचना करा. गावातील कामाचा माणूस हेरा. त्याला पक्षात घ्या. ग्रामपंचायतीला पहिलाच फटका बसला तर पुढे काही खरं नाही, असा सावधानतेचा इशारा त्यांनी युवा कार्यकर्त्यांना दिला. तसेच जो कष्ट घेईल त्याचेच भविष्य पक्षात ठरेल. माणूस काजू बदाम खाऊन नाही तर ठोकरा खाऊन हुशार होतो असंही ते म्हणाले.

भाजप परिवार तर काँग्रेस परिवाराचा पक्ष

दरम्यान, भाजप हा एक परिवार आहे. भाजप जनतेचा पक्ष आहे. तर काँग्रेस हा परिवाराचा पक्ष आहे, अशी बोचरी टीका दानवे यांनी काँग्रेसवर केली. त्यानी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टीकास्त्र डागले.

संबंधित बातम्या :

नाथाभाऊंचा उपयोग राज्याच्या भल्यासाठी करुन घ्यावा, विरोधकांवर टीकेसाठी करु नये, रावसाहेब दानवेंचा सल्ला

ज्या पक्षाने छळलं त्याच पक्षात नाथाभाऊंनी जाणं हे दुर्दैवी : रावसाहेब दानवे

राहुल गांधींना धक्काबुक्की नाहीच, गर्दीत फिरायची सवय नसल्याने ते पडले : रावसाहेब दानवे

(BJP Leader Raosaheb Danve appeals Young workers for active participation in aurangabad)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.