Hathras | योगी सरकारचे CBI चौकशीचे आदेश, गुन्हेगारांना पाठिशी घातले जाणार नाही- रावसाहेब दानवे

हाथरस प्रकरणात सीबीआय चौकशी सुरू आहे. गुन्हेगार कोणीही असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. (Raosaheb Danave comment on Hathras case investigation)

Hathras | योगी सरकारचे CBI चौकशीचे आदेश, गुन्हेगारांना पाठिशी घातले जाणार नाही- रावसाहेब दानवे
Follow us
| Updated on: Oct 04, 2020 | 9:02 PM

लातूर: हाथरस प्रकरणात चौकशी सुरू आहे. योगी सरकारने सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत, गुन्हेगार कोणीही असो, त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी चांगले आहेत हे सांगण्यासाठी रावसाहेब दानवे लातूर मध्ये आले होते. दानवे यांना पत्रकारांनी हाथरस प्रकरणी प्रश्न विचारताच पत्रकार परिषद आटोपण्यात आली. (Raosaheb Danave comment on Hathras case investigation)

हाथरस प्रकरणाची चौकशी सुरू होती, त्यात अडथळा येऊ नये म्हणून मीडियाला थांबवण्यात आले होते. त्यानंतर मीडियाला परवानगी देण्यात आली, अशी भूमिका रावसाहेब दानवेंनी मांडली. राहुल गांधींना कोणीही धक्का बुक्की केली नाही. मात्र, त्यांना जास्त गर्दीत फिरायची सवय नाही त्यामुळे ते पडले. विरोधी पक्षाचे नेते म्हणून मी त्यांचा सन्मान करतो, असे रावसाहेब दानवेंनी सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, आरक्षण मिळावे ही भाजपची भूमिका आहे. राज्य सरकारने व्यवस्थित मांडणी केली नसल्याने आरक्षणाला स्थगिती मिळाली, असे राबसाहेब दानवे म्हणाले आहेत.

रावसाहेब दानवे केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे शेतकऱ्यासांठी कसे लाभदायक आहेत. हे सांगण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. आज त्यांनी जालना, उस्मानाबाद आणि लातूरचा दौरा केला. उस्मानाबाद आणि लातूर मध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

लातूर येथील पत्रकार परिषदेत ते शेतकरी कायदे कसं चांगल आहे हे सांगत होते. मात्र, त्यांचं निवेदन संपल्याबरोबर पत्रकारांनी हाथरसमध्ये योगी सरकार असे वागले? पोलीस अधीक्षकाची बदली झाली, जिल्हा धिकाऱ्यांची का नाही, असे अनेक प्रश्न सुरू विचारणे सुरू केल्यानंतर दानवेंनी तपासानंतर बोलू असं सांगत पत्रकार परिषद आटोपली. पत्रकार परिषदेला लातूरमधील भाजप नेते उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

राहुल गांधींना धक्काबुक्की झालीच नाही, त्यांचा तोल गेला असावा : रावसाहेब दानवे

Hathras Case | हाथरस प्रकरणावर रावसाहेब दानवे यांची प्रतिक्रिया

(Raosaheb Danave comment on Hathras case investigation)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.