राज ठाकरेंच्या सभा म्हणजे ‘टुरिंग टॉकिज’चा शो : विनोद तावडे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणांगणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उतरले असून, नांदेड आणि सोलापुरात आतापर्यंत सभा घेतल्या आहेत. दोन्ही सभांमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावरुन आता भाजपमधून राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे टुरिंग टॉकिजचा शो […]

राज ठाकरेंच्या सभा म्हणजे टुरिंग टॉकिजचा शो : विनोद तावडे
Follow us on

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणांगणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे उतरले असून, नांदेड आणि सोलापुरात आतापर्यंत सभा घेतल्या आहेत. दोन्ही सभांमध्ये राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावरुन आता भाजपमधून राज ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. राज ठाकरे यांच्या सभा म्हणजे टुरिंग टॉकिजचा शो असल्याची जहरी टीका राज्याचे शिक्षणमंत्री आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांनी केली.

विनोद तावडे नेमकं काय म्हणाले?  

“काल राज ठाकरेंच्या टुरिंग टॉकिजचा सोलापूरला शो होता. त्या टुरिंग टॉकिजच्या शोमध्ये जुन्याच फिल्म दाखवल्या. तेच आरोप, त्याच गोष्टी त्यांनी दाखवल्या.” अशी जहरी टीका विनोद तावडे यांनी राज ठाकरेंच्या सभेवर केली.

तसेच, “जर योजना फसल्या असत्या, जर आम्ही थापा मारल्या असत्या, तर त्यानंतर झालेल्या सगळ्या निवडणुका ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपच जिंकत जाते आणि मनसे संपत जाते, याचं कारण काय? योजनांचं फलित म्हणजे लोकांचं मत.” असे म्हणत राज ठाकरे यांचे आरोपही विनोद तावडे यांनी खोडण्याचा प्रयत्न केला.

वाचा : राज ठाकरेंनी भरसभेत टीव्ही 9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट दाखवला

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी मतदानही पार पडलं. महाराष्ट्रात अजून तीन टप्पे बाकी आहेत. राज ठाकरे हेही प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. राज ठाकरे यांचा मनसे पक्ष जरी निवडणुका लढत नसला, तरी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात राज्यभर सभा घेत प्रचार करण्याच ठरवले आहे. त्यानुसार आतापर्यंत नांदेड आणि सोलापूर अशा दोन ठिकाणी सभा झाल्या आहेत. आज (16 एप्रिल) कोल्हापुरात राज ठाकरे यांची सभा होणार आहे.

वाचा : शरद पवार आणि राज ठाकरे यांचा सोलापुरात एकाच हॉटेलमध्ये मुक्काम

राज ठाकरे हे पुराव्यानिशी मोदी सराकरच्या कामांचा पर्दाफाश करताना दिसत आहेत. मोदींनी दिलेली आश्वासने आणि त्यातील फोलपणा फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून राज ठाकरे मांडत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभांचा परिणाम मोठा होताना दिसतो आहे. त्यामुळे भाजपच्या गोटातही खळबळ उडाली आहे.