शरद पवारांच्या एन्ट्रीला अजीम-ओ-शान शहंशाह गाणं, भाजपकडून ट्रोल, म्हणाले…

काल राष्ट्रववादीचं आठवं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. यात घडलेल्या एका घटनेमुळे भाजपने राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

शरद पवारांच्या एन्ट्रीला अजीम-ओ-शान शहंशाह गाणं, भाजपकडून ट्रोल, म्हणाले...
| Updated on: Sep 12, 2022 | 9:49 AM

मुंबई : काल राष्ट्रववादीचं आठवं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात शरद पवार स्टेजवर येत असताना अजीम-ओ-शान शहंशाह गाणं लावण्यात आलं. यावरून भाजपने राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि दिल्लीत गेलं की शहंशाहचं गुणगाणं गायचं, असं म्हणत भाजपने शरद पवारांवर निशाणा साधलाय.