“पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही, सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?”

पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही, सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?
Jayant Patil_Gopichand Padalkar

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे (BJP Samadhan Autade vs NCP Bhagirath Bhalke) यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला.

सचिन पाटील

|

May 02, 2021 | 3:58 PM

मुंबई : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीवरुन महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP Jayant Patil) यांच्यावर हल्लाबोल केला. पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’, असा प्रश्न गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केला. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान आवताडे (BJP Samadhan Autade vs NCP Bhagirath Bhalke) यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला. त्यानंतर आता भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (BJP Samadhan Autade defeated  NCP Bhagirath Bhalke in Pandharpur mangalwedha bypoll result Gopichand Padalkar taunts Jayant Patil)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी 11 एप्रिलला पावसात सभा घेतली होती. त्या सभेवरुन पडळकरांनी हे टीकास्त्र सोडलं. पडळकरांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन निशाणा साधला.

“पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’नुतन आमदार समाधान आवताडेंचं सात हजार मतांनी दणदणीत विजय झाल्याबद्दल हार्दीक अभिनंदन. जय मल्हार”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.

गोपीचंद पडळकर यांची फेसबुक पोस्ट

पावसात भिजलेलं सरपन फक्त धूर करतंय, जाळ नाही.. सांगा आता कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम?’

नुतन आमदार समाधान आवताडेंचं सात…

Posted by Gopichand Padalkar – गोपीचंद पडळकर on Sunday, 2 May 2021

 

जयंत पाटील यांची पावसात सभा

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मतदारसंघात सभा घेतली. नेहमीची सभा असती तर याकडे कदाचित लोकांचे लक्षसुद्धा गेले नसते. मात्र, भर पावसात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सभा दणाणून सोडली . त्यांची सभा आणि भाषण पाहून अनेकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.

सातारा लोकसभा पोटविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने 2019 साली शरद पवार यांनी भर पावसात साताऱ्यात सभा घेतली होती. अंगावर कोसळणारा पाऊस, डोक्यावर विजांचा कडकडाट असा सगळा माहोल असताना तसूभरही विचलीत न होता पवारांनी ही सभा दाणाणून सोडली होती.

VIDEO : जयंत पाटील यांची पावसातील सभा 

संबंधित बातम्या 

पुन्हा तुफान ! भर पावसात जयंत पाटलांची सभा, लोकांना शरद पवारांची आठवण

Sharad Pawar Satara Rain Speech | भरपावसातील शरद पवारांच्या सभेची वर्षपूर्ती, राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचलं

पवारांकडून आधी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संधी, आता वडिलांच्या जागी तिकीट, कोण आहेत भगीरथ भालके? 

(BJP Samadhan Autade vs NCP Bhagirath Bhalke)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें