AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Satara Rain Speech | भरपावसातील शरद पवारांच्या सभेची वर्षपूर्ती, राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचलं

जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली' अशा शब्दात राष्ट्रवादीने सोशल मीडियावर शरद पवारांच्या सभेतील क्षणचित्रं शेअर केली आहेत.

Sharad Pawar Satara Rain Speech | भरपावसातील शरद पवारांच्या सभेची वर्षपूर्ती, राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचलं
| Updated on: Oct 18, 2020 | 11:03 AM
Share

बारामती :शरद पवारांचं पावसातील भाषण‘ हे चार शब्द महाराष्ट्राच्या राजकारणाशी चिरपरिचित असलेल्या कोणालाही ‘ते’ भाषण आठवून देण्यास पुरेसं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या (Satara Loksabha Bypoll) पार्श्वभूमीवर घेतलेल्या ‘न भूतो न भविष्यति’ अशा या सभेला (Sharad Pawar speech in Rain at Satara) एक वर्ष पूर्ण झालं. उभ्या पावसात न थांबता, न थकता, पावसाच्या धारा परतवून लावत पवारांशी उपस्थितांशी संवाद साधला होता. राष्ट्रवादीनेही ‘जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’ असं म्हणत वर्षपूर्तीनिमित्त भाजपला पुन्हा चिमटे काढले आहेत. (NCP pinches BJP after one year of Sharad Pawar speech in Rain at Satara)

‘त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती. ते म्हणाले, #शरदपवार संपले. पण 18 ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला. जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’ अशा शब्दात राष्ट्रवादीने सोशल मीडियावर शरद पवारांच्या सभेतील क्षणचित्रं शेअर केली आहेत.

साताऱ्यात 18 ऑक्टोबर रोजी शरद पवार यांचं भाषण आयोजित करण्यात आलं होतं. मंचावर पवार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंवर बरसत होते, आणि अचानक पाऊस बरसण्यास सुरुवात झाली.

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले साताऱ्याचे तत्कालीन लोकसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. ‘चूक झाली तर ती चूक कबूल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली’ असं शरद पवार यांनी जाहीरपणे कबूल केलं. तसंच ही चूक दुरुस्त करण्याची संधी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आहे, असं सांगत सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन केलं होतं.

विशेष म्हणजे शरद पवार यांच्या पायाला जखम झालेली होती. अशा स्थितीतही त्यांनी पाऊस कोसळत असताना भाषण सुरु ठेवलं. ऐशी वर्षांच्या योद्ध्यावर फक्त राष्ट्रवादी समर्थकांनीच स्तुतिसुमनं उधळली, अशातील भाग नाही, तर भाजप वगळता इतर पक्षातील दिग्गज नेते, सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल मीडियावर कौतुक केलं.

विशेष म्हणजे पवारांचं आवाहन साताऱ्यातील जनतेने मनावर घेतलं. भाजपच्या तिकीटावर लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उदयनराजेंना दणदणीत पराभव झाला. तर श्रीनिवास पाटील मोठ्या मताधिक्याने लोकसभेवर निवडून गेले. हा पराभव उदयनराजेंच्याही जिव्हारी लागला होता. भाजपने यथावकाश त्यांचं राज्यसभेवर पुनर्वसन केलं. मात्र भर पावसातील शरद पवारांची ऐतिहासिक सभा उदयनराजे आणि भाजपला मोठी जखम देऊन गेली. (NCP pinches BJP after one year of Sharad Pawar speech in Rain at Satara)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पायाला जखम, भरपावसात भाषण, पाऊस कोसळला, पवार उदयनराजेंवर बरसले 

शरद पवारांची भर पावसात सभा, श्रीनिवास पाटील यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या 2 घोषणा

(NCP pinches BJP after one year of Sharad Pawar speech in Rain at Satara)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.