शरद पवारांची भर पावसात सभा, श्रीनिवास पाटील यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या 2 घोषणा

शरद पवारांची भर पावसात सभा, श्रीनिवास पाटील यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या 2 घोषणा

पवारांच्या भाषणानंतर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी दोनच घोषणा दिल्या.

सचिन पाटील

|

Oct 19, 2019 | 5:07 PM

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar speech in rain)  यांचं साताऱ्यातील पावसातलं भाषण चांगलंच गाजलं. शुक्रवारी 18 ऑक्टोबर रोजी शरद पवारांनी (Sharad Pawar speech in rain) उभ्या पावसात न थांबता, न थकता, पावसाच्या धारा परतवून लावत उपस्थितांशी संवाद साधला.

यावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. चूक झाली तर ती चूक कबूल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली, असं शरद पवार यांनी जाहीरपणे कबूल केले. तसेच ही चूक दुरुस्त करण्याची संधी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आहे असंही नमूद केलं. विशेष म्हणजे शरद पवार (Sharad Pawar speech in rain in Satara) यांच्या पायाला जखम झालेली होती. अशा स्थितीत देखील त्यांनी पाऊस कोसळत असताना पावसात भाषण केलं.

पवारांच्या भाषणानंतर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांनी दोनच घोषणा दिल्या. पवारांच्या भाषणावर कौतुकांचा वर्षाव होत असताना, श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांच्या दोन घोषणा जाता जाता दाद मिळवून गेल्या.

श्रीनिवास पाटील म्हणाले, “मान छत्रपतीच्या गादीला, मात्र तुमचं मत राष्ट्रवादीला……. ढगाला लागली कळंSSSS आणि राष्ट्रवादीला सारी मतं मिळं”

श्रीनिवास पाटलांच्या या दोन घोषणांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना स्फुरन चढलं.

महाराष्ट्र विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होत आहे. जेव्हा भर पावसात पवारांनी भाषण दिलं, त्याचंवेळी पवारांसोबत सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही भिजत होते.

संबंधित बातम्या 

पायाला जखम, भरपावसात भाषण, पाऊस कोसळला, पवार उदयनराजेंवर बरसले 

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें