पायाला जखम, भरपावसात भाषण, पाऊस कोसळला, पवार उदयनराजेंवर बरसले

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज (18 ऑक्टोबर) साताऱ्यात भरपावसात (Sharad Pawar speech in rain in Satara) सभा घेत उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले.

पायाला जखम, भरपावसात भाषण, पाऊस कोसळला, पवार उदयनराजेंवर बरसले


सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज (18 ऑक्टोबर) साताऱ्यात भरपावसात (Sharad Pawar speech in rain in Satara) सभा घेत उदयनराजेंवर जोरदार टीकास्त्र सोडले. चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली, असंही शरद पवार यांनी जाहीरपणे कबूल केले. तसेच ही चूक दुरुस्त करण्याची संधी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आहे असंही नमूद केलं. विशेष म्हणजे शरद पवार (Sharad Pawar speech in rain in Satara) यांच्या पायाला जखम झालेली होती. अशा स्थितीत देखील त्यांनी पाऊस कोसळत असताना पावसात भाषण केलं.

शरद पवार म्हणाले, “चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली. हे मी जाहीरपणे साताऱ्यात कबूल करतो. ती चूक दुरुस्त करण्यासाठी साताऱ्यातील घराघरातील तरुण, वडिलधारी सगळेजण 21 ऑक्टोबरची वाट पाहात आहेत. ते मतदानाच्या दिवशी आपल्या मताचा निर्णय घेऊन श्रीनिवास पाटलांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. यातून सातारकर आम्ही लोकांनी जी काही चूक केली त्याबाबत जो निर्णय घ्यायचा तो घेतील.”

ही निवडणूक महत्त्वाची आहे. एका बाजूने राज्याचे मुख्यमंत्री सांगतात निवडणुकीत आम्हाला काहीही दिसत नाही. ते म्हणतात निवडणुकीत दुसऱ्या बाजूला कुणी पहिलवान दिसत नाही. दुसरीकडे देशाचे पंतप्रधान प्रचारासाठी साताऱ्यात येऊन गेले. त्यानंतर मी त्यांना जाहीरपणे सांगितलं, की भाजपच्या तोंडी कुस्ती, पहिलवान हे शब्द शोभत नाही, असंही मत शरद पवार यांनी सांगितलं.

‘सातारा जिल्हा शब्दाला पक्का’

शरद पवार म्हणाले, “या निवडणुकीत कुस्ती वगैरे काही नाही. येणाऱ्या 21 तारखेला तुमच्या मतदानाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राला सातारा जिल्हा शब्दाला पक्का आहे आणि चुकीच्या गोष्टीला नाकारणारा असल्याचा संदेश मिळेल. सातारा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जतन करणारा आहे. तोच विचार तुम्हाला करायचा आहे. तो निश्चित कराल.”