पवारांकडून आधी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संधी, आता वडिलांच्या जागी तिकीट, कोण आहेत भगीरथ भालके?

राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके विरुद्ध भाजपचे समाधान अवताडे विरुद्ध शिवसेनेच्या बंडखोर शैला गोडसे अशी लढत होणार आहे. (Bhagirath Bhalke NCP Pandharpur bypoll)

पवारांकडून आधी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संधी, आता वडिलांच्या जागी तिकीट, कोण आहेत भगीरथ भालके?
भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना पंढरपूर पोटनिवडणुकीचे तिकीट
Follow us
| Updated on: Mar 29, 2021 | 4:55 PM

सोलापूर : राष्ट्रवादीने पंढरपूर–मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur Mangalvedha bypoll) अखेर आपला उमेदवार जाहीर केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत नाना भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भारत भालके (Bhagirath Bhalke) यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. भाजपने या निवडणुकीत समाधान अवताडे यांना तिकीट दिलं आहे, तर शिवसेनेच्या शैला गोडसे यांनी बंडखोरी केल्यामुळे आता इथे तिरंगी लढत होण्याची चिन्हं आहेत. (Who is Bhagirath Bhalke Bharat Nana Bhalke Son NCP Candidate Pandharpur Mangalvedha assembly election bypoll)

भगीरथ भालके यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादीतूनच प्रचंड विरोध होत होता. राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादीची घोषणा लांबली.

भारतनानांचा वारसा भगीरथाच्या हाती

भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. यावेळी भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. त्यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व 18 संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली होती.

पवारांनी संधी दिली, संचालकांनी विश्वास दाखवला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जेव्हा भालके कुटुंबियांना भेटण्यासाठी सरकोलीला गेले होते, तेव्हाच पवारांनी भगीरथ भालके यांना संधी देण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार संचालक मंडळाच्या बैठकीत सर्वच संचालकांनी भगीरथ भालके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची बिनविरोध निवड केली होती.

भगीरथ भालके हे गेल्या दहा वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात काम करत आहेत. साखर कारखाना अडचणींतून बाहेर काढण्याची जबाबदारी भगीरथ भालकेंवर आहे.

कोण आहेत भगीरथ भालके?

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र भारत भालकेंच्या निधनानंतर रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा दहा वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात कामाचा अनुभव

भालके कुटुंबाबाबत सहानुभूतीची लाट

भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे मतदारसंघात भालके कुटुंबाविषयी सहानुभूतीची लाट आहे. त्यामुळे भगीरथ भालकेंना तिकीट देण्यासाठी काही कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र भगीरथ भालके यांच्यापेक्षा जयश्री भालके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्या निवडून येण्याची शक्यता अधिक असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्याचीही चाचपणी झाली. परंतु अखेर भगीरथ भालके यांनाच संधी देण्याचं ठरलं.

भाजपचा उमेदवार

मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur Assembly By-Election) अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाजप उमेदवार समाधान महादेव आवताडे (Samadhan Awatade) यांचा अर्ज भरण्यासाठी दिग्गज नेते उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक तसेच जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि पदाधिकारी उद्या सकाळी उपस्थित राहणार आहेत.

पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

कोण आहेत समाधान आवताडे?

समाधान आवताडे यांनी 2014 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत आवताडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात

आवताडे हे दामाजी सहकारी कारखान्याचे चेअरमन आहेत

मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीतही अपक्ष उतरण्याची आवताडेंनी तयारी केली होती

आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने समाधान आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी

(Who is Bhagirath Bhalke Bharat Nana Bhalke Son NCP Candidate Pandharpur Mangalvedha assembly election bypoll)

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक 

17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!

अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021 >> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021 >> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021 >> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021 >> मतदान – 17 एप्रिल 2021 >> निवडणूक निकाल – 2 मे 2021

भारत भालके यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते कोरोनामुक्तही झाले होते. मात्र, पुढे त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर कायम वर्चस्व ठेवले. भारत भालके यांनी सलग 18 वर्षे विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती.

भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.

कोण होते भारत भालके?

  • पंढरपूर- मंगळवेढ्यातून राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके
  • हॅटट्रिक आमदार म्हणून आमदार भारत भालके यांची ओळख
  • 2009 मध्ये पंढरपूर विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करुन जायंट किलर ठरले
  • 2019 मध्ये माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला
  • 2002 पासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून आजतागायत काम पाहत होते
  • 1992 मध्ये ते तालुक्याच्या राजकारणात सक्रीय झाले. विठ्ठल कारखान्याचे संचालक म्हणून सुरुवात केली.
  • भारत भालके यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी, तीन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे.

भारत भालके यांच्या निवडणुकांचा इतिहास

    • 2004 : शिवसेना – पराभूत
    • 2009 : रिडालोस – विजयी
    • 2014 : काँग्रेस- विजयी
    • 2019 : राष्ट्रवादी – विजयी

संबंधित बातम्या :

भारतनानांचा वारसा मुलगा चालवणार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध

Pandharpur Assembly By-Election : राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर

(Who is Bhagirath Bhalke Bharat Nana Bhalke Son NCP Candidate Pandharpur Mangalvedha assembly election bypoll)

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.