AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Assembly By-Election : राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरपूर - मंगळवेढा (Pandharpur Mangalvedha bypoll) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे.

Pandharpur Assembly By-Election : राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Mar 29, 2021 | 4:14 PM
Share

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur Mangalvedha bypoll) आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भारत भालके (Bhagirath Bhalke) यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. दरम्यान, भाजपने या निवडणुकीत समाधान अवताडे यांना तिकीट दिल्याने, आता इथे तिरंगी लढत होण्याची चिन्हं आहेत.

राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके विरुद्ध भाजपचे समाधान अवताडे विरुद्ध शिवसेनेच्या बंडखोर शैला गोडसे अशी लढत होणार आहे.

भाजपचा उमेदवार

मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur Assembly By-Election) अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. भाजप उमेदवार समाधान महादेव आवताडे (Samadhan Awatade) यांचा अर्ज भरण्यासाठी दिग्गज नेते उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.

जयंत पाटील यांचं ट्विट

आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्री. भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा ! , असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं आहे.

भालके कुटुंबाबाबत सहानुभूतीची लाट

भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे मतदारसंघात भालके कुटुंबाविषयी सहानुभूतीची लाट आहे. मात्र भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यापेक्षा जयश्री भालके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, लाटेवर निवडून येण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्यासाठी जोर देत होते. पण त्याऐवजी राष्ट्रवादीने आता भगीरथ भालके यांना मैदानात उतरवलं आहे. (Pandharpur Assembly By-Election BJP Candidate Samadhan Awatade to file nomination)

भारत भालके यांचं निधनामुळे पोटनिवडणूक

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते कोरोनामुक्तही झाले होते. मात्र, पुढे त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.

भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक 

17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!

अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021 >> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021 >> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021 >> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021 >> मतदान – 17 एप्रिल 2021 >> निवडणूक निकाल – 2 मे 2021

भाजपचा उमेदवार 

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. समाधान महादेव आवताडे यांना भाजपकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता चांगलीच चुरशीची होणार असल्याचे बोललं जात आहे.

पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. समाधान आवताडे यांना आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

कोण आहेत समाधान आवताडे?

समाधान आवताडे यांनी 2014 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत आवताडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात

आवताडे हे दामाजी सहकारी कारखान्याचे चेअरमन आहेत

मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीतही अपक्ष उतरण्याची आवताडेंनी तयारी केली होती

आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने समाधान आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी

संबंधित बातम्या :

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस, भाजपचा अधिकृत उमेदवार जाहीर

भालकेंच्या जागी पोटनिवडणुकीत मुलगा की पत्नी? अजितदादा-जयंत पाटील पंढरपुरात फैसला करणार

(Pandharpur Assembly By-Election BJP Candidate Samadhan Awatade to file nomination)

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी….

Todays Gold Rate: आता खरेदी करणं शक्यच नाही! सोन्याचे भाव चांगलेच वाढले, आज 10 ग्रॅमसाठी…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या...

शस्त्रक्रियेवर अमिताभ बच्चन यांचा मोठा खुलासा, थेट म्हटले, माझ्या..