AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपूर पोटनिवडणूक : समाधान आवताडे उमेदवारी अर्ज भरणार, भाजपच्या दिग्गजाचं शक्तिप्रदर्शन

राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे (Pandharpur By-Election BJP Samadhan Awatade)

पंढरपूर पोटनिवडणूक : समाधान आवताडे उमेदवारी अर्ज भरणार, भाजपच्या दिग्गजाचं शक्तिप्रदर्शन
भाजपतर्फे समाधान आवताडे पंढरपूर पोटिनवडणुकीचे उमेदवार
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 29, 2021 | 2:28 PM
Share

पंढरपूर : मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी (Pandharpur Assembly By-Election) अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृत उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. तर भाजप उमेदवार समाधान महादेव आवताडे (Samadhan Awatade) यांचा अर्ज भरण्यासाठी दिग्गज नेते उपस्थित राहून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. (Pandharpur Assembly By-Election BJP Candidate Samadhan Awatade to file nomination)

समाधान आवताडे उद्या (मंगळवार 30 मार्च) उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार प्रशांत परिचारक तसेच जिल्ह्यातील भाजपचे नेते आणि पदाधिकारी उद्या सकाळी उपस्थित राहणार आहेत.

कोण आहेत समाधान आवताडे?

समाधान आवताडे यांनी 2014 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत आवताडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात

आवताडे हे दामाजी सहकारी कारखान्याचे चेअरमन आहेत

मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीतही अपक्ष उतरण्याची आवताडेंनी तयारी केली होती

आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने समाधान आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी

भगीरथ भालकेंच्या उमेदवारीला विरोध

आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर 17 एप्रिल रोजी पंढरपुरात पोटनिवडणूक होत आहे. भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला विरोध केल्याने वाद निर्माण झाला.

भालके कुटुंबाबाबत सहानुभूतीची लाट

भारत भालके यांच्या अकाली मृत्यूमुळे मतदारसंघात भालके कुटुंबाविषयी सहानुभूतीची लाट आहे. मात्र भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्यापेक्षा जयश्री भालके यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर, लाटेवर निवडून येण्याची दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्यासाठी जोर देत आहेत. (Pandharpur Assembly By-Election BJP Candidate Samadhan Awatade to file nomination)

भारत भालके यांचं निधनामुळे पोटनिवडणूक

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं 28 नोव्हेंबर रोजी निधन झालं. ऑक्टोबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पण त्यानंतर ते कोरोनामुक्तही झाले होते. मात्र, पुढे त्यांची प्रकृती ढासळत गेली. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. भारत भालके यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.

भारत भालके हे सलग तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाले होते. मात्र तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले. 2009 साली पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करत भारत भालके हे जायंट किलर ठरले होते. 2019 साली माजी आमदार (कै.) सुधाकर परिचारक यांचा त्यांनी पराभव केला होता.

संबंधित बातम्या :

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस, भाजपचा अधिकृत उमेदवार जाहीर

भालकेंच्या जागी पोटनिवडणुकीत मुलगा की पत्नी? अजितदादा-जयंत पाटील पंढरपुरात फैसला करणार

(Pandharpur Assembly By-Election BJP Candidate Samadhan Awatade to file nomination)

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...