भारतनानांचा वारसा मुलगा चालवणार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध

भारत भालके यांचे 18 वर्ष कारखान्याच्या अध्यक्षपदावर वर्चस्व, आता पुत्र भगीरथ भालकेंना जबाबदारी

भारतनानांचा वारसा मुलगा चालवणार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध
Follow us
| Updated on: Dec 21, 2020 | 1:51 PM

पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या सुपुत्राची वर्णी लागली आहे. भगीरथ भालके यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अध्यक्षपदाचा एकमताने फैसला झाला. सहाय्यक निबंधक एम एस तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड झाली. (Bharat Bhalke son Bhagirath Bhalke elected as Vitthal Co operative Sugar Factory Chairman unopposed)

भारत भालके यांचे 28 नोव्हेंबर 2020 रोजी वयाच्या 60 व्या वर्षी निधन झाले. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. पुण्यातील रुबी हॉल क्लिनीकमध्ये उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. 1992 साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. 2002 पासून त्यांनी कारखान्याच्या अध्यक्षपदावर कायम वर्चस्व ठेवले. भारत भालके यांनी सलग 18 वर्षे विठ्ठल कारखान्याची धुरा सांभाळली होती.

कारखान्याच्या संस्थापकांच्या नातवाचे आव्हान

भारत भालके यांच्या निधनानंतर विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांमध्ये मोठी दुफळी निर्माण झाली होती. कारखान्याचे संस्थापक औदुंबरआण्णा पाटील यांचे नातू युवराज पाटील यांनी चेअरमनपदासाठी उघडपणे दंड थोपटले. होते तर भारतनानांचे समर्थक मात्र भगीरथ भालकेंसाठी आग्रही होते.

18 संचालकांची भगीरथ भालकेंना पसंती

चेअरमनपदासाठी भगीरथ भालके यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्यण अधिकारी एस. एस. तांदळे यांनी जाहीर केले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड करण्यात आली. कारखान्याच्या एकूण 21 पैकी 3 संचालकांचे निधन झाले आहे. आज बैठकीला उपस्थित असलेल्या 18 संचालकांनी भगीरथ भालके यांच्या नावाला पसंती दिली. भगीरथ भालके हे गेल्या दहा वर्षांपासून संचालक मंडळात काम करत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पाच सहा दिवसांपूर्वी  भालके यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी सरकोली येथे आले होते. त्यावेळी पवारांनी भगीरथ भालके यांना संधी देण्याचे सूतोवाच केले होते. त्यानुसार आज झालेल्या बैठकीत सर्वच संचालकांनी भगीरथ भालके यांच्यावर विश्वास दाखवत त्यांची बिनविरोध निवड केली. निवडीनंतर विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे यांनी भगीरथ भालके यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी भालके समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे विस्तारीकरण त्यांनी केले. परंतु गेल्या काही वर्षात कारखान्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला. इतिहासात पहिल्यांदाच कारखाना बंद ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यंदाचा गळीत हंगाम सुरु करण्यासाठी भारत भालकेंनी कर्ज मंजूर करुन घेतल्याने कारखाना पुन्हा सुरु झाला.

साखर कारखाना अडचणींतून बाहेर काढण्याची जबाबदारी भगीरथ भालकेंवर आहे. पुढच्या महिन्यात कारखान्याची निवडणूक असून ती भगीरथ भालकेंच्या नेतृत्वात लढवली जाणार आहे. (Bharat Bhalke son Bhagirath Bhalke elected as Vitthal Co operative Sugar Factory Chairman unopposed)

कोण होते भारत भालके?

  • पंढरपूर- मंगळवेढ्यातून राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके
  • हॅटट्रिक आमदार म्हणून आमदार भारत भालके यांची ओळख
  • 2009 मध्ये पंढरपूर विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करुन जायंट किलर ठरले
  • 2019 मध्ये माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला
  • 2002 पासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून आजतागायत काम पाहत होते
  • 1992 मध्ये ते तालुक्याच्या राजकारणात सक्रीय झाले. विठ्ठल कारखान्याचे संचालक म्हणून सुरुवात केली.
  • भारत भालके यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी, तीन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे.

भारत भालके यांच्या निवडणुकांचा इतिहास

    • 2004 : शिवसेना – पराभूत
    • 2009 : रिडालोस – विजयी
    • 2014 : काँग्रेस- विजयी
    • 2019 : राष्ट्रवादी – विजयी

संबंधित बातम्या :

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

‘भालके नेहमी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी धडपड करायचे; महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला’

(Bharat Bhalke son Bhagirath Bhalke elected as Vitthal Co operative Sugar Factory Chairman unopposed)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.