
मुंबई महानगरपालिका : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गेल्या निवडणुकीत वॉर्ड क्रमांक 50 हा अराखिव होता. आता वॉर्डाचं गणित थोडंफार बदललं आहे. उभेच्छुक सोशल मीडियाच्या माध्यमातून कामाला लागले आहेत. विद्यमान नगरसेवक हे प्रमुख उमेदवार असले, तरी इतर पक्षाचे नेतेचे सक्रिय झाले आहे. त्यामुळं यावेळी कोणत्या पक्षाचा उमेदवार बाजी मारतो, हे पाहावं लागेल. मुंबई महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 50 अर्थात रामनगर (Ramnagar) होय. हा मतदारसंघ अराखीव होता. या प्रभागात सुंदरनगर, महेशनगर, उद्योगनगर, रामनगर या भागाचा समावेश होतो. या प्रभागात 2017 च्या निवडणुकीत भाजपचे दिपक ठाकूर (Deepak Thakur) यांनी बाजी मारली होती. दीपक ठाकूर यांनी शिवसेनेचे दिनेश राव (Dinesh Rao) या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला होता. या मतदारसंघावर दीपक ठाकूर यांचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं.
| पक्ष | उमेदवार (Candidate) | विजयी/आघाडी (Win/Lead) |
|---|---|---|
| शिवसेना | निधी प्रमोद शिंदे | 4,485 मतं |
| भाजप | रुक्मिणी विठ्ठल खरटमोल | 3,256 मतं |
| काँग्रेस | उषा अनिल कांबळे | 1,333 मतं |
| राष्ट्रवादी | रेशा मधुकर शिससाट | 1,716 मतं |
| मनसे | शोभा अशोक शानभाग | 1,009 मतं |
| अपक्ष/ इतर |
2017 च्या निवडणुकीत एकूण 11 उमेदवार निवडणूक लढले होते. काँग्रेसच्या उमेदवार स्नेहा झगडे यांनी दोन हजार 739 मतं घेतली होती. मनसेचे उमेदवार हरेश साळवी यांनी एक हजार 429 मतं घेतली होती. मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. प्रभागात एकूण मतदार 42 हजार 981 होते. त्यापैकी 22 हजार 566 मतदारांनी मतदान केले होते. नोटाला 379 मतं मिळाली होती. 48 हजार 3 लोकसंख्या आहे. त्यात अनुसूचित जातीचे 1 हजार 733 तर अनुसूचित जमातीचे 173 लोकसंख्या आहे. गेल्या निवडणुकीत नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्षाच्या चिंतामणी द्विवेदी यांना फक्त 90 मतं मिळाली होती. त्यांच्यापेक्षा जास्त मतं अपक्षांना मिळाली होती. यावेळी नवीन मतदार आले आहेत. हा युवा मतदार कुणाला मतं देतो, यावर निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे. बहुतेस सर्वज राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. मतदारांच्या भेटीगोटी सुरू आहेत. याचा कुणाला कितरत फायदा होतो. कुणाला मतदार पसंती देतील, हे येणारी वेळच ठरवेल.
दिनेश राव (शिवसेना) 6783
हरेश साळवी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 1429
दीपक ठाकूर (भारतीय जनता पक्ष) 10,645
स्नेहा झगडे (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) 2739