Mahayuti clash : निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजप आमदारांची अजितदादांवर नाराजी
महाराष्ट्र विधान परिषदेत भाजपच्या आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अर्थखात्यावर निधी वाटप आणि फाईल अडवल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिणय फुके आणि चरणसिंह ठाकूर यांनी थेट आरोप करत महायुतीतच शाब्दिक चकमक घडवली. यामुळे महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेत निधी वाटपावरून सत्ताधारी महायुतीमध्येच अंतर्गत वाद उफाळून आला. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अर्थखात्यावर भाजपनेते परिणय फुके आणि चरणसिंह ठाकूर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. अजित पवार फाईलवर सह्या करत नाहीत आणि निधी वाटपात अडथळे आणत असल्याचा आरोप भाजपने केला. विशेषतः, ओबीसी योजना आणि कृषी महाविद्यालयाच्या फाईल्स थांबल्याने आमदारांनी संतप्त सवाल उपस्थित केले. यावरून विधान परिषदेत भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. यापूर्वी शिंदे गटाच्या आमदारांकडूनही अशाच तक्रारी येत होत्या, मात्र आता भाजपच्या आमदारांनीही थेट पवारांना लक्ष्य केल्याने महायुतीतील अंतर्गत धुसफूस वाढल्याचे दिसून येते.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा

