AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…ती तर महाविकास आघाडीमधील नेत्यांची जुनीच सवय; बंडातात्या कराडकरांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. बंडातात्या कराडकर यांनी काल वाईन विक्रीच्या निर्णयासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर चंद्रकांत पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे.

...ती तर महाविकास आघाडीमधील नेत्यांची जुनीच सवय; बंडातात्या कराडकरांच्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
चंद्रकांत पाटलांचा राऊतांना सवाल
| Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 7:09 PM
Share

अहमदनगर :  भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर (Maha Vikas Aghadi) निशाणा साधला आहे. बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी काल वाईन विक्रीच्या निर्णयासंदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून मोठा गोंधळ उडाला होता. कराडकर यांच्या या वक्तव्याची महिला आयोगाकडून देखील दखल घेण्यात आली होती. आता यावर चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. बंडातात्या कराडकर यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दारूच्या निर्णयामुळे आपण व्यथित झालो, त्यामुळे आपण बोललो असे कराडकर यांनी म्हटले आहे. आता हा विषय संपवायला हवा. मात्र रोज एखादा नवा विषय काढायचा आणि लक्ष विचलित करायचे ही महाविकास आघाडीची सवयच असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आम्ही विरोधात आहोत म्हणून तर सर्व सुरळीत चालले आहे. नाहीतर या सरकारने काय केले असेत याचा भरवसा नाही असे देखील पाटील यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीची भूमिका दुटप्पी

पुढे बोलताना पाटील यांनी म्हटले आहे की, आमची भूमिका ही राज्यातील महाविकास आघाडी सरकारसारखी नाही. आम्ही महाविकास आघाडी सारखे बोलत नाही. आपल्या बाजूने निकाल लागला तर न्यायालये चांगले आणि समजा निकाल विरोधात गेला तर सर्व भाजपाच्या इशाऱ्यावर अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. सीबीआयच्या बाबतीमध्ये देखील तेच आहे. तपास बाजूने लागल्यास सीबीआय चांगली विरोधात गेल्यास सीबीआय भाजपाच्या इशाऱ्यावर काम करत असल्याची टीका होते. मात्र आमचा न्यायालयावर विश्वास आहे. म्हणूनच आम्ही निलंबित बारा आमदारांची लढाई न्यायालयाच्या माध्यमातून लढल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या पुराव्याशिवाय बोलत नाहीत

किरीट सोमय्या हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. याबाबत चंद्रकांत पाटलांना विचारले असता ते म्हणाले की, किरीट सोमय्या जे बोलतात ते योग्य बोलतात. ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्याकडे त्या गोष्टींचे पुरावे असतात. सुजित पाटकर यांच्या कंपनीत संजय राऊत आणि त्यांच्या मुलीची भागिदारी आहे, अशा बातम्या येत आहेत. सोमय्या यांनी देखील तसे म्हटले आहे. त्यांच्याकडे त्या संदर्भातील पुरावे असल्याचा दावा देखील सोमय्या यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

‘पक्षासाठी आणि महाराष्ट्रासाठी तुरुंगात जायला आणि मरायलाही तयार’, सोमय्यांच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊतांचं वक्तव्य

Goa Elections 2022 : गोव्यात प्रचाराची झिंग, महिलेने राहुल गांधींना मारली चक्क मिठी

Goa Assembly Elections : गोव्यात भाजपच्या पायाखालची वाळू सरकली, माहोल आम्ही तयार केला-संजय राऊत

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.