AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडलं हे मोदी-शहांना सांगणार; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान; युतीच्या हालचालींना वेग?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भेट घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज दिल्लीत दाखल झाले आहेत. (Chandrakant Patil)

राज ठाकरे यांच्या भेटीत काय घडलं हे मोदी-शहांना सांगणार; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान; युतीच्या हालचालींना वेग?
chandrakant patil
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 11:35 AM
Share

नवी दिल्ली: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल भेट घेतल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून राज यांच्यासोबत झालेल्या भेटीतील तपशीलावर चर्चा करणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे मनसे-भाजपच्या युतीला वेग आल्याचं बोललं जात आहे. (chandrakant patil reached at delhi to meet pm narendra modi)

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दिल्लीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे, मंत्री डॉ. भागवत कराड, कपिल पाटील, भारती पवार आणि इतर नव्या मंत्र्यांची भेट घेणार आहे. त्यासाठीच दिल्लीत आलो आहे. इतक्यात काही संघटनात्मक बदल होतील असं वाटत नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते राम शिंदे, संजय कुटे, जयकुमार रावल आणि श्रीकांत भारतीय उपस्थित होते.

राज्यातील परिस्थितीवर चर्चा होणार

राज ठाकरे यांच्याशी अपघाताने नाशिकमध्ये भेट झाली होती. त्यामुळे काल आमची भेट झाली. त्यांनी चहासाठी बोलावलं होतं. आता दिल्लीत आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. त्यांनी भेट दिल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती, राज्यातील संघटनात्मक कामं यावर चर्चा होईल. यावेळी राज यांच्यासोबत झालेली भेट आणि भेटीतील चर्चेचा तपशीलही त्यांना देण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पंकजा मुंडे दिल्लीत येणार

दरम्यान, येत्या सोमवारी पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगंटीवार सुद्धा दिल्लीत येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच मीडियाला भाजप कधीच कळली नसल्याचंही ते म्हणाले.

दिल्लीत भाजपची खलबतं

दिल्लीत भाजपची एक बैठक पार पडणार असल्याचं सांगितलं जातं. भाजपच्या कोअर कमिटीचे सदस्य दिल्लीत दाखल झाले आहेत. आता देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार ही दिल्लीत दाखल होणार आहेत. जयकुमार रावल, राम शिंदे आणि संजय कुटेही दिल्लीत आल्याने भाजपची बैठक होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (chandrakant patil reached at delhi to meet pm narendra modi)

संबंधित बातम्या:

तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्; ‘या’ नेत्यानं केलं कौतुक

स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् राऊतांना कसलं आव्हान देताय; मुश्रीफांचा चंद्रकांतदादांना खोचक टोला

राजीव गांधी मोठे नेते, नेहरु गांधींचं नाव बदलण्याचं या सरकारचं धोरण, राऊतांचा हल्लाबोल

(chandrakant patil reached at delhi to meet pm narendra modi)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.