तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्; ‘या’ नेत्यानं केलं कौतुक

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तेजस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (tejas thackeray)

तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्; 'या' नेत्यानं केलं कौतुक
tejas thackeray

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने तेजस यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र, शिवसेनेच्या एका नेत्याने तेजस यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सध्या या शुभेच्छांची चर्चा होत आहे. (milind narvekar greets tejas Thackeray on birthday)

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दैनिक ‘सामना’च्या पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. त्यात त्यांनी तेजस ठाकरे यांची तुलना महान क्रिकेटपटून व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… असं या जाहिरातीत नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तेजस यांचा क्रिकेटशी संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

तुलना का?

या जाहिरातीत तेजस ठाकरे यांच्यासोबत व्हिव्हियन रिचर्डस् यांचाही फोटो देण्यात आला आहे. हे दोन्ही फोटो पाहिल्यानंतर तेजस आणि रिचर्डस् यांच्या चेहऱ्यात बरंच साम्य दिसून येत असल्याचं दिसून येत आहेत. तेजस यांचा लूक रिचर्डस् यांच्यासारखाच असल्याने नार्वेकर यांनी त्यांची तुलना रिचर्डस् यांच्याशी केली असावी असं सांगितलं जातं.

तेजस ठाकरे काय करतात?

वडील उद्धव ठाकरे आणि मोठे बंधू-मंत्री आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे तेजस ठाकरे अद्याप सक्रीय राजकारणात उतरलेले नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी तेजस यांचे दर्शन घडले होते. आदित्य ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तेजस यांनी प्रचारात सहभाग घेतला होता. वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तेजस ठाकरे यांनी वन्य जीवांचा अभ्यास करताना खेकड्यांच्या अन्य प्रजाती शोधून काढल्या आहेत. यातील एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबियांचे नाव दिलं आहे. गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडीटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातीची नावं आहेत. यातील शेवटचं नाव हे ठाकरे या आडनावावरुन देण्यात आलं आहे.

तेजस ठाकरे यांनी गेल्यावर्षी पालीच्या दुर्मिळ प्रजातीचा शोध लावला होता. कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खडकांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेत भर पडली आहे. तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, इशान अग्रवाल आणि सौनक पाल या चार संशोधकांनी 2014 मध्ये या पालींच्या प्रजातीचा शोध लावला होता. मात्र, गेली पाच वर्षे या दुर्मिळ प्रजातींच्या पालींचे जनुकीय वेगळेपण आणि प्राणी शरीरशास्त्राच्या नियमानुसार सविस्तर संशोधन करण्यात आलं. या नव्याने शोधण्यात आलेल्या दुर्मिळ पालीचं नाव ‘मँग्निफिसंट डवार्फ गेको’ (Magnificent Dwarf Gecko) असं ठेवण्यात आलं आहे.

सप्टेंबर 2020 मध्ये तेजस यांनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावला होता. महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून ‘कॅट स्नेक’ सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध लागला होता. या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव ‘बोईगा ठाकरे’ (Snake Boiga Thackeray) असं ठेवण्यात आलं होतं. (milind narvekar greets tejas Thackeray on birthday)

 

संबंधित बातम्या:

तेजससोबत फोटोसाठी आग्रह, उद्धव म्हणाले, मला स्टुलावर उभं राहावं लागतं!

तेजस ठाकरेंच्या राजकारणातील प्रवेशावर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

स्वत:ला गाव राखता आलं नाही अन् राऊतांना कसलं आव्हान देताय; मुश्रीफांचा चंद्रकांतदादांना खोचक टोला

(milind narvekar greets tejas Thackeray on birthday)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI