AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK Weather Report : भारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट, मॅच रद्द झाल्यास सुपर 8 मध्ये कुठली टीम जाईल?

IND vs PAK Weather Report : भारतासोबत श्रीलंका टी20 वर्ल्ड कपचा यजमान आहे. उद्या कोलंबोत बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. या मॅचवर पावसाचं सावट आहे. अजून पर्यंत श्रीलंकेत एकही सामना पावसामुळे रद्द झालेला नाही. पण भारत-पाक सामन्यात हे चित्र बदलू शकतं.

IND vs PAK Weather Report : भारत-पाक सामन्यावर पावसाचं सावट, मॅच रद्द झाल्यास सुपर 8 मध्ये कुठली टीम जाईल?
IND vs PAK Image Credit source: PTI
| Updated on: Feb 14, 2026 | 8:08 AM
Share

IND vs PAK R Premdasa Stadium Pitch Report and Weather Updates in Marathi : भारत-पाकिस्तानमध्ये मागच्या काही वर्षात वर्ल्ड कपमध्ये अनेक सामने झाले आहेत. त्या सामन्यांपेक्षा टी20 वर्ल्ड कपमध्ये उद्या होणार्‍या सामन्याबद्दल थोडी जास्तच उत्सुक्ता आहे. याचं कारण आहे या मॅच आधी झालेला वाद. पाकिस्तानने आधी या सामन्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. नंतर आयसीसी सोबत झालेल्या बैठकीनंतर यू-टर्न घेत भारताविरुद्ध खेळण्यासाठी राजी झाले. मागच्या वर्षी आशिया कप 2025 च्या फायनलनंतरही वाद झाला होता. त्यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळलं होतं. यावेळी सुद्धा वातावरण तसच गरम आहे. पण भारत-पाक सामन्याच्या या उत्सुक्तेवर, प्रतिक्षेवर आणि गरमा गरमीवर पाणी फेरलं नाही म्हणजे मिळवलं. कारण कोलंबोमध्ये 15 फेब्रुवारीला पावसाचा अंदाज आहे. तसा इशारा सुद्धा देण्यात आलाय.

रविवारी 15 फेब्रुवारीला ग्रुप ए मध्ये असलेल्या भारत-पाकिस्तानमध्ये मॅच होणार आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे हा सामना होईल. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी फॅन्सच्या मनात प्रचंड उत्सुक्ता आहे. श्रीलंकन हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरला, तर या सर्व उत्साहावर पाणी फेरलं जाऊ शकतं. शुक्रवारी श्रीलंकेच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, दक्षिण-पूर्व मध्ये कमी दबावाचं क्षेत्र तयार होऊ शकतं. त्यामुळे सर्वच लोकांना सर्तक रहाण्यास सांगितलं आहे.

पावसाबद्दलचा अंदाज काय?

सरकारी स्टेटमेंटमध्ये थेट पाऊस पडेल असं म्हटलेलं नाही. पण हवामानावर नजर ठेवणार्‍या वेबसाइटनुसार, रविवारी संध्याकाळी 6 वाजता, 7 वाजता आणि 8 वाजता पावसाचा अंदाज आहे. असं झाल्यास हा सामना रद्द होऊ शकतो. अशा स्थितीत दोन्ही टीम्सना प्रत्येकी 1-1 पॉइंट मिळेल.

सामना रद्द झाल्यासं नुकसान कोणाचं?

मॅच रद्द झाल्यास कुठल्या टीमचा फायदा आणि नुकसान होईल?. फायद्याबद्दल बोलायचं झाल्यास दोन्ही टीम्सना समान फायदा होईल. कारण दोन्ही टीम्सचे प्रत्येकी 4-4 पॉइंट्स आहेत. मॅच रद्द झाल्यास 1-1 पॉइंट दोघांना मिळेल. म्हणजे दोन्ही टीम्सचे 5-5 पॉइंट होतील. दोन्ही टीम्स सुपर-8 मध्ये क्वालिफाय करतील. नुकसानीबद्दल बोलायचं झाल्यास अमेरिका आणि नेदरलँड्स दोन्ही टीम्सचं नुकसान होईल. USA ची सलग दुसऱ्यांदा सुपर 8 मध्ये पोहोचण्याची संधी हुकेल. नेदरलँड्स आणि USA चे 2-2 पॉइंट्स आहेत. दोघांचा आता फक्त एक सामना शिल्लक आहे. दोघांनी आपपले सामने जिंकले तर त्यांचे 4-4 पॉइंट होतील. ते पुरेसे नसतील.

USA सुपर-8 मध्ये पोहोचू शकते का?

भारत-पाकिस्तान सामन्याचा निकाल लागल्यास एक टीम सुपर-8 राऊंडमध्ये पोहोचेल. पण दुसऱ्या टीमला नेदरलँड्स आणि USA शी खेळावं लागेल. नेदरलँड्सचा मार्ग कठीण आहे. कारण त्यांचा शेवटचा सामना भारताशी आहे. तेच USA चा शेवटचा सामना नामीबिया विरुद्ध आहे. 15 फेब्रुवारीला टीम इंडियाने पाकिस्तानला हरवलं आणि नामीबियाने पाकिस्तानला नमवलं आणि USA ने नामीबियाला हरवलं, तर अमेरिकी टीम पुढच्या राऊंडमध्ये पोहोचेल.

Follow Us
थोड्याच वेळात शिवसेना चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील सरोदेंचं वक्तव्य
अध्यक्षांनी साक्ष, पुरावे, प्रश्नोत्तरे सगळंच... थोड्याच वेळात शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील असीम सरोदेंचं विधान चर्चेत
संजय राऊतांकडुन तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी...
संजय राऊतांकडुन तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी नेमकं काय घडलं?
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमा
सुनेत्रा पवारांचे अध्यक्षपद खरंच अवैध? सचिदानंद सिंह यांची पुन्हा रिमाईंडर नोटीस, आता...
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर?
मूळ शिवसेना कुणाची? 7 दिवसांच्या सुनावणीनंतर निकाल कोणत्या वळणावर? आज ठाकरेंचे वकील...
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत...
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..