AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण

राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण

| Updated on: Jul 02, 2026 | 3:36 PM
Share

राज्यातील राजकारणात विरोधी पक्ष म्हणून एकमेकांवर टीका करणारे नेते आता सहकार क्षेत्रात मात्र एकत्र आल्याचे चित्र औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे. जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपचे नेते एकाच व्यासपीठावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि भाजपचे मंत्री अतुल सावे यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीसंदर्भातील रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, अंबादास दानवे हे महायुतीच्या पॅनलकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाच्या रिंगणात उतरले आहेत. सहकारी संस्थांच्या निवडणुकीत पक्षचिन्ह नसल्यामुळे स्थानिक पातळीवरील समीकरणांनुसार विविध पक्षांतील नेते एकत्र येत असल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून येत आहे.

औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदासाठी ४ जुलै रोजी मतदान होणार असून, या निवडणुकीकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी अंबादास दानवे यांना पाठिंबा दिल्याने या निवडणुकीतील राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.  

Published on: Jul 02, 2026 03:36 PM

Follow Us