Shiv Sena Symbol : धनुष्यबाण चिन्हाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मोठा दावा

ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठा दावा केला आहे.

Shiv Sena Symbol : धनुष्यबाण चिन्हाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मोठा दावा
| Updated on: Oct 10, 2022 | 11:12 PM

मुंबई : निवडणुक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा देखील वापर करता येणार नाही. शिवसेना हे पक्षाचे नाव देखील लावता येणार नाही असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले होते. या सर्व घडामोडीनंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले आहे. तर शिंदे गटाला चिन्हासाठी पर्याय सुचवण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत. ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्हाबाबत मोठा दावा केला आहे.

विधानसभेतील आमदारांचा पाठिंबा आणि शिवसेनेच्या 70 टक्के जास्त पदाधिका-यांनी आम्हाला पांठिबा दिला आहे. बहुमत आमच्याकडे असल्याने धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळायला पाहिजे असे शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका आम्ही घेतली होती. बाळासाहेबांची शिवसेना म्हणुन आमच्या पक्षाला मान्यता मिळाली आहे. मशाली अन्याया विरुद्ध पेटवल्या पाहिजेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी देखील मशाली पेटवल्या होत्या. हे अन्याया विरोधात मशाली पेटवणार का? असं म्हणत एकनाथ शिंदे ठाकरे गटावर दावा केला आहे.

बहुमत ज्यांच्याकडे असते त्यांना चिन्ह मिळते हा आमच्यावरचा अन्याय आहे. मेरीट वर चिन्ह आम्हालाच मिळाले पाहिजे. सोशल मिडियावर आमची बदनामी केली जात असल्याचा दावा देखील शिंदेनी केला आहे.

उलट्या काळजाचे विश्वास घातकी कोण हे सर्वांना माहित आहे. उलट्या काळजाच्या माणसाने 2014 साली ज्याला दया माया नाही निती धर्म नाही सर्वच त्याग केला त्यांनी आत्मपरीक्षण करावे.

अंधेरीची निवडणूक आम्ही युती म्हणुन लढवणार आणि आम्हीच जिंकणार. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळाले नाही याचे दु:ख आहे. बहुमत आमच्याकडे आहे. देशातील 14 राज्यप्रमुखांनी आम्हाला समर्थन दिले आहे.