Eknath Shinde : असा हा मुख्यमंत्र्यांचा साधेपणा..! स्पेशल प्रोटोकॉलविनाच करणार प्रवास, पोलिस महासंचालकांना काय निर्देश?

मुख्यमंत्री हे प्रवास करीत असताना प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतुक रोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याचे गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे.

Eknath Shinde : असा हा मुख्यमंत्र्यांचा साधेपणा..! स्पेशल प्रोटोकॉलविनाच करणार प्रवास, पोलिस महासंचालकांना काय निर्देश?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 4:35 PM

मुंबई : (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून हे (Government) सरकार सर्वसामान्यांचे असल्याचेच सांगितले आहे. केवळ सांगितलेच नाही तर जखमी वारकऱ्यांशी त्यांनी साधलेला संवाद किंवा पावसामध्ये अडकेलेल्या मुंबईकरांसाठी बेस्टचा पर्याय अशी उदाहरणेही समोर आली आहेत. आता त्यांच्या साधेपणाचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे ते म्हणजे आता त्यांच्या ताफ्याला प्रवासात (Special Protocol) स्पेशल प्रोटोकॉल राहणार नाही. हो, त्यांनीच यासंबंधी पोलिस महासंचालक व आयुक्तांना तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आवडेल असा निर्णय खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेतला आहे. यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणार नाही शिवाय वाहनचालकांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागणार नाही.

मुख्यमंत्र्यांचा नेमका उद्देश काय ?

मुख्यमंत्री हे प्रवास करीत असताना प्रवासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी प्रवास मार्गावरील वाहतुक रोखण्यात येते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या बंदोबस्तासाठी अनेक पोलीस तैनात केले जात असल्याने पोलीस दलावर कामाचा ताणही वाढत असल्याचे गेले तीन चार दिवस प्रवास करताना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. त्यामुळे आता मुख्यमंत्र्याच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नसणार आहे.

एका निर्णयाचे दोन फायदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशाप्रकारे निर्णय घेऊन सर्वसामान्यांच्या मनात घर केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे वाहतूक कोंडीतर होणार नाहीच पण मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणून तास् तास ताटकळत उभे राहणाऱ्या पोलिसांना देखील यामधून दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गीकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाणार नाही याची खबरदारी आता घेतली जाणार आहे. निर्णय छोटा असला तरी सर्वसामान्यांवर परिणामकारक आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिस महासंचालकांशी चर्चा अन् निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवण्यात येते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा होऊन वाहनचालकांना मनस्ताप होतो. गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये हीच बाब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आली होती. त्यामुळेच त्यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा करून याबाबतचे निर्देश दिले आहेत.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.