Shinzo Abe shot dead: कोणी मारल्या जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना गोळ्या? हल्ल्या केल्यानंतरही हल्लेखोर जागेवरच का उभा राहिला?

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या हल्लेखोराने हा गोळीबार केला त्याचे वय ४२ वर्ष आहे. त्याचे नाव यामागामी तेत्सुया असे सांगण्यात आले आहे. तो माजी सैनिक होता आणि आबे यांची धोरणे त्याला पसंत नव्हती म्हणून त्याने गोळीबार केल्याचे सांगण्यात येते आहे.

Shinzo Abe shot dead: कोणी मारल्या जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना गोळ्या? हल्ल्या केल्यानंतरही हल्लेखोर जागेवरच का उभा राहिला?
शिंजो आबे यांचा मारेकरीImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 08, 2022 | 4:20 PM

टोकियो – जपानचे माजी पंतप्रधान (Former Japanese Prime Minister)शिंजो आबे ( Shinzo Abe)हे स्टेजवर भाषण करत असताला त्यांच्यावर गोळीबार (shot)करण्यात आला. आबे यांना दोन गोळ्या मारण्यात आल्या. गोळ्या मारल्यानंतर हल्लेखोर जागीच उभा राहिला. त्याने हल्ला केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. आबे यांच्यावर हा हल्ला नारा शहरात निवडणूक प्रचारावेळी करण्यात आला आहे. जगभरातील नेते आबे यांचा सन्मान करीत होते. या हल्ल्यानंतर हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि त्याची चौकशी करण्यात येते आहे. दरम्यान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या शिंजो आबे यांचे निधन झाले आहे.

हल्लेखोर माजी सैनिक, वय ४२ वर्ष

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या हल्लेखोराने हा गोळीबार केला त्याचे वय ४२ वर्ष आहे. त्याचे नाव यामागामी तेत्सुया असे सांगण्यात आले आहे. तो माजी सैनिक होता आणि आबे यांची धोरणे त्याला पसंत नव्हती म्हणून त्याने गोळीबार केल्याचे सांगण्यात येते आहे. यामागामी याने वापरलेली स्टेनगनही जप्त करण्यात आली आहे. संपूर्ण जगात जपानमध्ये बंदुकीच्या वापराबाबत सर्वात कठोर नियम आहेत. त्या ठिकाणी खुलेआम हा प्रकार घडल्याने अनेकांचा आश्चर्य वाटले आहे. आबे यांच्यावर हल्ला करण्यासाठी स्टेनगनचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे.

शिंजो आबे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर

शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले पंतप्रधान होते. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांची निवड पंतप्रधानपदासाठी करण्यात आली होती. सर्वात कमी वयात पंतप्रधान होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. २०२० साली कोलायटिस या आजारामुळे त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली

आपल्या प्रिय मित्रांपैकी एका मित्राचे निधन झाल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. भारत आणि जपान यांच्यातील संबंध दृढ होण्यात आबे यांचा मोलाचा वाटा असल्याचेही मोदी म्हणाले आहेत. आबे यांनी नुकतंच जपान-भारत असोसिएशनचे अध्यक्षपद स्वीकारल्याचा उल्लेही मोदींनी केला आहे. आबे यांच्या निधनानंतर भारतातही एका दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे.

Non Stop LIVE Update
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीत मतदानाच्या आदल्या रात्री..अमोल कोल्हेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?
तर धनुष्यबाणावर विरोधात निवडणूक लढवणार, किरण सामंत यांचा इशारा कुणाला?.
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल
ठाकरेंवर मानसिक परिणाम, त्यांना.., भाजपच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल.
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर
लोकसभा निवडणुकीत केजरीवालांना दिलासा, तिहार तुरुंगातून येणार बाहेर.
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत
मोदींच्या ऑफरवर शरद पवारांचं उत्तर, म्हणाले, ... हे माझं स्पष्ट मत.
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर
सगळी स्वप्न पूर्ण होतील, फक्त... मोदींची ठाकरे-पवारांना भर सभेतून ऑफर.
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका
... तर तुम्हीच औरंगजेबाचे वंशज, संजय राऊतांची मोदींवर घणाघाती टीका.
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले.....
प्रियंका चतुर्वेदींनी केलेल्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले......
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज
नकली संतान... मोदींच्या टीकेवर ठाकरे म्हणाले, बेअकली माणसा तेव्हा लाज.
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?
ब्रेक घेतोय... कोल्हेंचा 5 वर्ष अभिनयातून संन्यास, का घेतला निर्णय?.