Cm Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या सभेचा मुहूर्त ठरला, 14 मे, 15 मे अथवा 16 मे रोजी बीकेसीतून मुख्यमंत्री बाण सोडणार

| Updated on: Apr 27, 2022 | 9:23 PM

शिवसेनेचा शिवसंपर्क अभियानाचा दुसऱ्या टप्प्याची शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुंबईतील बीकेसीतील जाहीर सभेने होणार आहे. शिवसेना मेळावा बीकेसी मे महिन्यात 14 मे, 15 मे अथवा 16 मे या दिवशी घेण्यासंदर्भात शिवसेनेची विभाग प्रमुखांची बैठक शिवसेना भवनात पार पडली.

Cm Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या सभेचा मुहूर्त ठरला, 14 मे, 15 मे अथवा 16 मे रोजी बीकेसीतून मुख्यमंत्री बाण सोडणार
उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील प्रश्नांचे उत्तर देणार? की केंद्रावरच जबाबदारी ढकलणार? सभेआधी नितेश राणेंचे 4 सवाल
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शिवसेनेचा (Shivsena) शिवसंपर्क अभियानाचा दुसऱ्या टप्प्याची शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या मुंबईतील बीकेसीतील जाहीर सभेने होणार आहे. शिवसेना मेळावा बीकेसी मे महिन्यात 14 मे, 15 मे अथवा 16 मे या दिवशी घेण्यासंदर्भात शिवसेनेची विभाग प्रमुखांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. शिवसंपर्क शुभारंभ सभेत सौ सोनार की एक लोहार की देण्यासंदर्भात रणनीती शिवसेनेकडून ठरली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून जाहीरपणे आपली सध्याच्या राजकीय वादांवर भूमिका मांडतील. त्यामुळे उद्धव ठाकरे राज्यात सध्या सुरू असलेल्या वादावार आणि हनुमान चालीसा, तसेच हिंदुत्वावर (Hindutva) काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही दिवसांपूर्वीच बेस्टच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्या तारखाही आता आल्या आहेत.

राज ठाकरेंना जोरदार उत्तर देणार?

राज ठाकरेंची गुढी पाडव्याची सभा ही मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीला टार्गेट करणारी होती. राज ठाकरेंनी मुख्यंत्रीपदापासून ते सरकारस्थापनेपर्यंत आणि हिंदुत्वापासून ते मशीदीवरील भोंग्यापर्यंत या सर्व मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधाला आहे. तसेच सध्याही राज्या हनुमान चालीसा पठणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यावरही मुख्यमंत्री पलटवार करण्याची आणि राज ठाकरेंचा समाचार घेण्याची दाट शक्यता आहे. मुंबईतल्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी तसे संकेतही दिले आहे. त्यामुळे या सभेकडे संपूर्ण राजकारणासह महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात यावरून बराच राजकीय वादंग सुरू आहे.

भाजपला हिंदुत्वावरून प्रत्युत्तर देणार?

या सभेत हिंदुत्वासह इतर अनेक मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. आता राज्यात सुरू असलेला राडा आणि नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक झाल्यानंतर शिवसेनेवर जोरदार टीका होत आहे. हनुमान चालीसा पठणाला शिवसेनाचा विरोध का आहे, असा सवाल वारंवार विचारला जात आहे. तर आमचा हनुमान चालीसा पठणाला विरोध नाही मात्र घरात हनुमान चालीसा वाचा आमच्या दारावर येऊ नका, असा पलटवार शिवसेना नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर शिवसेनेने सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्व सोडल्याची टीका भाजकडून होत आहे. या टीकेचाही मुख्यमंत्री खरपूस समाचार घेण्याची शक्यता आहे. गेल्या भाषणात बोलताना हिंदूत्व म्हणजे धोतर नाही, जे हवं तेव्हा सोडायला अशा शब्दात मुख्यमंत्री विरोधकांवर बरसताना दिसून आले होते.