AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breaking : जितेंद्र आव्हाडांना धक्का, टाटा रुग्णालयाला ‘म्हाडा’च्या सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून स्थगित!

शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

Breaking : जितेंद्र आव्हाडांना धक्का, टाटा रुग्णालयाला 'म्हाडा'च्या सदनिका देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून स्थगित!
शरद पवारांच्या हस्ते म्हाडाच्या सदनिकाांच्या चाव्या टाटा रुग्णालयाला सुपूर्द
| Edited By: sagar joshi | Updated on: Jun 22, 2021 | 10:09 PM
Share

मुंबई : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ड्रिम प्रोजेक्टला आणि पर्यायानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. कारण टाटा कॅन्सर रुग्णालयाला 100 सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यावर तपासून अहवाल सादर करावा तोपर्यंत स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारत या निर्णयाला स्थगिती दिली आहे. महत्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते टाटा कॅन्सर रुग्णालयाला या सदनिकांच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र आता या निर्णयाला स्थगिती दिली गेल्यामुळे आव्हाड आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मिळाल्याचं पाहायला मिळत आहे.  (uddhav Thackeray postpones Jitendra Awhad’s decision to give MHADA flats to Tata Hospital)

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीबाबत जितेंद्र आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता, आपण हा निर्णय एका उदात्त भावनेनं घेतला होता. यामध्ये माझा कुठलाही स्वार्थ नाही. बाहेर गावाहून येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी या एका उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला होता. पण या निर्णयाला स्थगिती येणं ही दुर्देवाची बाब आहे. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांपासून कुठलिही गोष्ट लपवून ठेवली नव्हती. ते आमचे विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेताना त्यांना कल्पना दिल्याशिवाय घेत नाही. म्हाडाच्या सदनिकांच्या चाव्या टाटा रुग्णालयाला सुपूर्द करतानाही आपण मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली होती. मात्र, याबाबत काही गैरसमज झाले असावेत. आपण याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. तर या निर्णयाला स्थगिती मिळाल्याबाबत त्यांनी खंतही व्यक्त केलीय.

दरेकरांकडून आव्हाडांच्या निर्णयाचं कौतुक, प्रश्नही उपस्थित

“खरं तर कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हा निर्णय ज्या दिवशी झाला, त्या दिवशी मी जितेंद्र आव्हाड यांचं अभिनंदन केलं होतं. कारण गावाकडून येणाऱ्या रुग्णांची मुंबईत राहण्यासाठी सोय होत नाही. मुंबईतल्या नातेवाईकांनाही आपल्या नातेवाईकांना आपल्या घरी ठेवता येत नाही. अशावेळी हा संवेदनशील निर्णय घेण्यात आला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनीही अशा निर्णयाच्या बाबती संवेदनशीलपणे निर्णय घेण्याची आवश्यकता होती. मग प्रश्न असा उपस्थित होतो की, निर्णय घेतला तेव्हा मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं नव्हतं का? किंवा त्यांची परवानगी घेतली गेली नव्हती का? असा प्रश्न उपस्थित होतो. असं झालं नसेल तरी मुख्यमंत्र्यांनी याबाबत संवेदनशीलपणे निर्णय घेणं अपेक्षित होतं. राजकारणापलिकडे जाऊन या निर्णयाकडे पाहिलं पाहिजे. या ठिकाणी स्थगिती मागण्याचं किंवा तक्रार करण्याचं कारण काय, याचा उलगडा व्हायला हवा. मुख्यमंत्री संवेदनशील आहेत असं बोललं जातं. मग या निर्णयामध्ये नेमका काय अडथळा आला? अजय चौधरींना का समजावलं नाही? अहवाल कशासाठी मागितला? अशा प्रकारच्या निर्णयामागे मुख्यमंत्र्यांना कुठला संशय आहे का? हे काही कळायला मार्ग नाही”, अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिलीय.

16 मे रोजी पवारांच्या हस्ते चाव्या टाटा रुग्णालयाकडे सुपूर्द

16 मे रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. बडवे यांच्याकडे शरद पवार यांच्या हस्ते या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या होत्या. यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, टाटा हॉस्पिटलचे डॉ. बडवे, डॉ. श्रीखंडे, गृहनिर्माणचे सचिव श्रीनिवासन, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डिगीकर आदी उपस्थित होते.

रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

राज्यच नव्हे तर देशभरातून टाटा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अनेक कॅन्सर रुग्ण येत असतात. मात्र त्यांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय नसल्याने फुटपाथवरच राहावं लागतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची सोय व्हावी म्हणून म्हाडाच्या 100 खोल्या टाटा रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता.

300 चौरस फुटांची घरे

300 चौरस फुट असलेले 100 फ्लॅट टाटा मेमोरियल रूग्णालयास उपलब्ध करून देण्यात आले आहेत. असे आव्हाड यांनी सांगितले. या घरांच्या देखभालीची संपूर्ण जबाबदारी टाटा मेमोरियल रूग्णालयाला देण्यात आली असून गृहनिर्माण विभाग व टाटा मेमोरियल रूग्णालय यांच्यामध्ये लवकरच कारारनामा करण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

कॅन्सर पेशंटच्या नातेवाईकांसाठी द्यायच्या घरांचं काय झालं?, आव्हाड भेटीला येताच शरद पवारांचा पहिला सवाल

थँक्यू आव्हाडसाहेब, टाटा कॅन्सर सेंटरला म्हाडाकडून 100 फ्लॅट्स

uddhav Thackeray postpones Jitendra Awhad’s decision to give MHADA flats to Tata Hospital

Follow Us
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...